Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्याचा पुतण्या तुतारी फुंकणार?, स्थानिक समीकरणे अनुकूल असल्याने पवारांची घेतली भेट
सोलापूर : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. दरम्यान जागावाटपावरून तिढा असलेल्या मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरु आहे. शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे पुतणे भैरवनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत (Anil Sawant) यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे.
विधानसभेसाठी ते तुतारी कडून लढण्यास इच्छुक आहेत. पंढरपूर विधानसभेसाठी अनिल सावंत इच्छुक आहेत. पंढरपूरमधून लढण्यासाठी अनिल सावंत-प्रशांत परिचारक यांच्यात स्पर्धा आहे. दुसरीकडे साखर सम्राट अभिजीत पाटील कधीही उडी मारून भूमिका बदलू शकतात, अशी परिस्थिती आहे. दरम्यान अनिल सावंत यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली.
विधानसभेसाठी स्थानिक समीकरणे अनुकूल असल्याचे सांगत तुतारीवर लढलो तर विजय संपादन करेन, असे सर्वेक्षण सांगत असल्याचे सावंत यांनी पवारांना सांगितल्याची माहिती मिळत आहे. विद्यमान आमदार या नात्याने महायुतीकडून समाधान आवताडे हेच उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये पंढरपूरची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने इच्छुक उमेदवार शरद पवार यांच्याकडे जाऊन चर्चा करत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय