Khadakwasla Pune Crime News | ‘गुड टच, बॅड टच’ बाबत माहिती देताना 11 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर; खडकवासला भागातील प्रकार
पुणे: Khadakwasla Pune Crime News | गुड टच आणि बॅड टच बाबत माहिती देताना अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या अकरा वर्षांच्या मुलीवर एका विकृत नराधमाकडून खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याची धक्कादायक घटना खडकवासला येथे घडली आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून दिलीप नामदेव मते Dilip Namdev Mate (वय ६७ वर्षे, रा. खडकवासला) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या सुरक्षिततेसाठी शनिवारी ‘गुड टच, बॅड टच’ बाबत शाळेतील शिक्षिकांनी मुलींना माहिती दिली. यात पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या अकरा वर्षीय मुलीने स्वतः बाबत शुक्रवारी असा प्रकार झाल्याचे सांगितले. याबाबत शिक्षकांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्या मुलीने आपल्या बाबतीत घडलेली धक्कादायक घटना सांगितली. (POCSO Act)
आरोपीने खाऊसाठी पैसे देण्याचे सांगून घरात नेऊन अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले.
शिक्षिका, मुख्याध्यापक यांनी तातडीने याबाबत पालक,
शिक्षक संघातील सदस्यांशी चर्चा केली व हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
पालकांच्या तक्रारीवरून या घटनेबाबत हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दिलीप नामदेव मते याला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. पुढील तपास हवेली पोलीस करत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय