Maharashtra Politics News | गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावर शरद पवार गटात मतभेद? रोहित पवार आणि जयंत पाटील यांची मतमतांतरे
मुंबई : Maharashtra Politics News | राज्याची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घडी विस्कटलेली आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कारभारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) मतभेद असल्याचे समोर आले आहे. रोहित पवारांनी गृहमंत्र्यांच्या राजीनामा मागितला तर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हे सरकारचं अपयश असून एका व्यक्तीला दोष देणार नाही म्हणत राजीनाम्याला काही अर्थ नाही असे म्हंटले आहे.
जयंत पाटील म्हणाले, आता दोन महिनेच राहिले आहेत. दोन महिन्यासाठी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणे त्याला काही अर्थ वाटत नाही. हे अपयश संपूर्ण सरकारचे आहे. एका व्यक्तिला दोष देणार नाही. मुख्यमंत्र्यांपासून सगळं सरकार महाराष्ट्रात अपयशी ठरलेलं आहे. महिलांना, बालकांना ते संरक्षण देऊ शकत नाही. आता पोलिसांवरही हल्ले व्हायला लागलेत.
त्याचा अर्थ पूर्णपणे महाराष्ट्रात पोलिसांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रकार सरकार करत आहे. कुणाची कधी बदली होईल, कोणत्या कारणासाठी होईल, सगळ्याच बदल्या आर्थिक व्यवहाराने झाल्या तर नैतिकता राहिली कुठे हा प्रश्न महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांबद्दल जनतेला पडायला लागला आहे असे त्यांनी सांगितले.
तसेच आज कोयता गँग पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करते (Koyta Attack On Police Officer), तो अत्यंत गंभीर आहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडले आहेत. पोलिसांचा वचक राहिलेला नाही. पोलिसांनी नियंत्रण आणण्यासाठी कठोर पाऊल उचललं गरजेचे होते. मात्र गृह खात्याचा भोंगळ कारभार पुढे आलेला आहे. त्यातून पोलिसांचे मनोबल खच्चीकरण होतंय. अधिकारी कोणती कारवाई करायला धजावत नाही, गुन्हेगारी प्रबळ व्हायला लागली आहे.
महाराष्ट्राच्या पोलीस दलामागे सरकारने ठाम उभे राहिले पाहिजे. अशा दृष्ट प्रवृत्ती संपवण्यासाठी सरकारने काही भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्र सरकारचं राज्याच्या पोलीस दलाकडे लक्ष नाही. ते राजकारणात गुंतले आहेत. त्यामुळे पोलिसांवर हल्ले करण्याची कुवत गुंडाची झाली आहे. कोयत्याने पोलिसावर हल्ला होणे हे अतिशय धक्कादायक आहे. पुण्यातील पोलीस यंत्रणा किती दुबळी झाली हे पुन्हा एकदा समोर आले असं जयंत पाटील यांनी म्हटले.
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, जर सत्तेत असणाऱ्या आमदारांनाच सुरक्षित वाटत नसेल तर या महाराष्ट्राची परिस्थिती काय झालेली आहे हे बघा. खासदार, माजी खासदारांना सुखरुप वाटत नसेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा. आम्ही हे आधीपासून म्हणतोय. राज्यात महिलाही सुखरुप नाहीत, नेतेही सुरक्षित नाहीत.
त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र? अशी म्हणायची वेळ आली आहे
असं सांगत आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली.
महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या,
मी बंदूक घेऊन देईन असं विधान शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी केले होते. त्यावर रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.
बदलापूरच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) गृहमंत्र्यांवर निशाणा साधला होता.
गृहमंत्री दिल्लीत जास्त असतात. महाराष्ट्रात घटना घडते परंतु प्रतिक्रिया दिल्लीतून जास्त येते.
त्यामुळे गृहमंत्री कदाचित पार्ट टाईम महाराष्ट्रात काम करतात. ही घटना प्रचंड वेदनादायी आहे.
नैतिकतेच्या आधारावर या सर्व गोष्टींची जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांनी घ्यावी.
पोलिसांच्या बदल्या करून गृहमंत्र्यांची जबाबदारी सुटत नाही.
ही एक घटना नाही, तर महाराष्ट्रात गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे.
त्यामुळे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे
यांनी बदलापूर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना केली होती. (Maharashtra Politics News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय