Sinhagad Road Pune Murder Case News | दोन मित्रांमध्ये रेनकोटवरून झालेल्या वादातून पोटात चाकू भोसकून खून; नऱ्हे परिसरातील धक्कादायक घटना

Murder

पुणे : Sinhagad Road Pune Murder Case News | सिंहगड रोड भागातील नन्हे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.. रेनकोट वरून झालेल्या वादातून डिलिव्हरी बॉयने मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. आदित्य वाघमारे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुरेश भिलारे या तरुणाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य आणि सुरेश हे दोघेही मित्र असून सकाळी एका पिझ्झा रेस्टॉरंट मध्ये काम करतात आणि संध्याकाळी एका शॉपिंग वेबसाईट साठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात.दोघेही मूळचे बीड जिल्ह्याचे असून गेल्या एक महिन्यापासून एकमेकांच्या ओळखीचे होते.

काल (दि.२५) दुपारी त्या दोघांमध्ये रेनकोट वरून वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी त्या दोघांनी रात्री नन्हे भागात भेटण्यासाठी ठरवलं. रात्री १०.३० वाजता ते दोघे ही भेटले मात्र वाद मिटण्याच्या ऐवजी त्यांच्यात अजून वादावादी झाली. दरम्यान, भिलारे ने त्याच्याकडील असलेला चाकू वाघमारेच्या पोटात खुपसला. या हल्ल्यात वाघमारे जखमी झाला आणि उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. (Sinhagad Road Pune Murder Case News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”

You may have missed