Payvatachi Savali Marathi Movie | मीना शमीम फिल्म्स प्रस्तुत ‘पायवाटाची सावली’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटाची उत्सुकता शिगेला ! गावरान गोडवा, लेखकाच्या आयुष्याची अनसुनी कहाणी झळकणार रुपेरी पडद्यावर, ‘पायवाटाची सावली’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Payvatachi Savali Marathi Movie

‘पायवाटाची सावली’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध संगीतकार अमित बिस्वास यांनी लावली हजेरी

ऑनलाइन टीम – Payvatachi Savali Marathi Movie | लेखकाचा खडतर प्रवास पायवाटाची सावली या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच मान्यवरांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत संपन्न झाला. या चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक मुन्नावर शमिम भगत, बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध संगीतकार अनिल बिस्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास, मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक शिरीष राणे, या चित्रपटाचे वितरक अकात डिस्ट्रीब्यूशनचे संस्थापक चंद्रकांत विसपुते हे उपस्थित होते. हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.

लेखकाच्या खऱ्या आयुष्यातील खडतर प्रवास या चित्रकथेतून मोठ्या पडदयावर येणार आहे. जीवनातील कठीण परिस्थितीशी त्याने दिलेली झुंज या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये पाहायला मिळत आहे. तसेच यात एका सुंदर गावातील जीवनशैली आणि साध राहणीमान ट्रेलर मध्ये दिसून येत आहे.

‘मीना शमीम फिल्म्स’ प्रस्तुत ‘पायवाटाची सावली’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची व लिखाणाची धुरा मुन्नावर शमीम भगत यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू ‘मीना शमीम फिल्म्स’ने सांभाळली आहे. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत अमित अनिल बिस्वास यांनी केले आहे. या चित्रपटात विजे भाटिया, शाल्वी शाह, रेवती अय्यर, प्रसाद माळी आणि शीतल भोसले हे कलाकार आहेत.

या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक – लेखक मुन्नावर शमीम भगत यांनी त्यांचा अनुभव शेअर करत अस म्हटलं की, “एका गावात अनेक वर्ष पाऊस पडलेला नसतो. तेथील लोक पाण्यविणा आपला उदरनिर्वाह कसा करतात. त्यांची पाण्यप्रतीची तळमळ या चित्रपटात रेखाटली आहे. आयुष्यात हरलेला व स्वतःला निराशेच्या डोहात बुडवलेल्या एका लेखकाची दुर्दशा यात मांडली आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाचा ट्रेलर नक्की आवडेल अशी मी आशा करतो. तसेच काहींना अस वाटेल की हे माझ्यासोबत देखील घडल आहे. काहीना आपल्या खऱ्या आयुष्याच्या वास्तवाची देखील प्रचिती होईल. सर्वांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन एकदा तरी नक्की पहावा अशी मी आशा करतो.”

बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध संगीतकार अनिल बिस्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास यांचे
या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण झाले त्याविषयी ते सांगतात.
”माझे मित्र मुन्नावर शमीम भगत यांनी माझ्यावर या चित्रपटाच्या संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी दिली.
तेव्हा मला फार आनंद झाला. कारण माझे वडील अनील बिस्वास यांनी हिंदी संगीतसृष्टीत खूप उत्तम काम केलं
आणि मी आता त्यांच्या संगीताचा वारसा पुढे नेत आहे यात मला आनंद आहे. या चित्रपटातील गाणी सुंदर झाली आहेत.
तुम्ही सर्वांनी हा चित्रपट १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.”

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”

You may have missed