Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसला पुन्हा अच्छे दिन येणार? महायुतीतील काही नेत्यांसह 1400 जणांनी काँग्रेसकडे मागितली उमेदवारी

Rahul Gandhi In Maharashtra

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर आल्या असल्याने राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. इच्छुक उमेदवार मतदारसंघात बैठका,मेळावे, सभा घेत आहेत. दुसरीकडे जागावाटपाच्या मुद्यावरून ज्याठिकाणी सोयीस्कर आहे अशा पक्षात नेते उडी मारताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसने (Congress) मोठे यश मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. या निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला.

आता काँग्रेसमधील नेत्यांसह महायुतीच्या नेत्यांचाही पक्षावर विश्वास वाढलेला आहे. कारण दोन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील १४०० जणांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. यामध्ये महायुतीच्या नेत्यांचाही समावेश आहे.

यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केले की, विधानसभेसाठी तिकीट वाटप मेरिटच्या आधारावरच होईल. ते म्हणाले, “लोकसभेच्या निकालानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. आम्हाला इच्छुक उमेदवारांकडून हजारो अर्ज प्राप्त होत आहेत, परंतु आम्ही हे स्पष्ट केले आहे की उमेदवारी मेरिटनुसार दिली केली जाईल. यासह इतर पक्षातील प्रमुख नेतेही आमच्या सोबत येण्यास उत्सुक आहेत.”

दरम्यान, २०१४ मध्ये आधी केंद्रातून काँग्रेसची सत्ता गेली आणि नंतर त्यांनी महाराष्ट्रही गमावले. अशात गेल्या १० वर्षांत पक्षाला राज्यात खूप कठीण काळातून जावे लागले. या काळात झालेल्या काही निवडणुकांमध्ये तर उमेदवारही मिळत नव्हते. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलल्याचे पाहायला मिळाले.

लोकसभेत काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष झाल्यानंतर विधानसभेतही सर्वात मोठा पक्ष होण्याचे अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहेत.
त्यामुळे अनेकजण काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

२०१४ मध्ये ४२ जागा जिंकलेली काँग्रेस २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ४४ जागा जिंकली होती.
त्यामुळे आता यंदाच्या विधानसभेत काँग्रेस कशी कामगिरी करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”

Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून

Malabar Gold & Diamonds | मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला 2023-24 साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स’ पुरस्काराने केले सन्मानित

Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान

You may have missed