Pune Crime News | पायी जाणार्‍या महिलांचे मंगळसुत्र हिसकाविणारा चोरटा जेरबंद ! तीन गुन्हे उघडकीस, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

Bharti Vidyapeeth Police

पुणे : Pune Crime News | पायी जाणार्‍या महिलांचे दुचाकीवरुन येऊन मंगळसुत्र हिसकाविणार्‍या चोरट्याला पकडण्यास भारती विद्यापीठ पोलिसांना (Bharti Vidyapeeth Police Station) यश आले आहे. त्याच्याकडून तीन गुन्ह्यातील २ लाख २५ हजार रुपयांचे मंगळसुत्रे, हार जप्त करण्यात आले आहेत. (Chain Snatcher Arrested)

समर्थ राजू कोंथिबिरे Samarth Raju Konthibire (वय २६, रा. निवृत्तीनगर, वडगाव बुद्रुक, मुळ सोलापूर) असे या चोरट्याचे नाव आहे. पायी जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजाने सोन्याचे मंगळसुत्र पांढरे रंगाचे अ‍ॅक्टीव्हा दुचाकीवरुन आलेल्याने हिसकावून नेल्याची फिर्याद २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून १० मिनिटे ते ३ वाजून २० मिनिटे या दरम्यान आंबेगाव पठार (Ambegaon Pathar) येथील खेडेकर चाळ येथे घडली होती.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सांगर बोरगे, अवधुत जमदाडे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे पांढरे रंगाचे अ‍ॅक्टीव्हा दुचाकीवर एक संशयित दिसून आला. या संशयिताचा शोध घेत असताना पोलीस अंमलदारांना समर्थ कोंथिबिरे हा गुन्ह्यात वापरलेली दुचाकीवर लेकटाऊन भागात दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. अटकेदरम्यान तपासात त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. त्याचबरोबर त्याने आणखीन सोन्याचा लक्ष्मीहार व दुचाकी गाडी चोरी केल्याचे कबुली दिली. त्याच्याकडून २ लाख २५ हजार रुपयांचे ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व हार, जप्त केले. तसेच दुचाकी गाडी जप्त केली असून त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. (Pune Crime News)

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहर झिने, सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमाले,
अवधुत जमदाडे, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, महेश बारवकर,
चेतन गोरे, निलेश जमदाडे, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, सतिश मोरे, निलेश खैरमोडे,
धनाजी धोत्रे, सचिन गाडे, विनोद कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”

Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून

Malabar Gold & Diamonds | मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला 2023-24 साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स’ पुरस्काराने केले सन्मानित

Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान

You may have missed