Devendra Fadnavis On Harshvardhan Patil | हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले – “निवडणुकीच्या काळात काहीजण…”
पुणे : Devendra Fadnavis On Harshvardhan Patil | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. दरम्यान जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर उमेदवारीसाठी ज्याठिकाणी सोयीचे ठरेल त्या पक्षात इच्छुक पक्षांतर करताना दिसत आहेत. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.
इंदापूरमधून (Indapur Assembly Constituency) अजित पवारांच्या (Ajit Pawar NCP) पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने गेली काही वर्ष भाजपसोबत घरोबा असलेले हर्षवर्धन पाटील वेगळी वाट धरण्याच्या तयारीत आहेत.
आज (दि.२७) हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली. हर्षवर्धन पाटील खरंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेण्याच्या मार्गावर आहेत का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोण कोणाची भेट घेत आहे, हे महत्वाचे नाही. भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात लोक प्रवेश करत आहेत. मागच्या आठवड्यात अनेकांनी प्रेवश केला. त्याआधीच्या आठवड्यातही अनेकांनी पक्षप्रवेश केला. यापुढेही भारतीय जनता पक्षात खूप प्रवेश होतील.
हे खरं आहे की निवडणुकीच्या काळात काहीजण इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे येतात.
मात्र, मला विश्वास आहे की, हर्षवर्धन पाटील असतील किंवा आमचे इतर नेते असतील ते आमच्याबरोबरच राहतील,
असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”
Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून