Lonikand Pune Crime News | पुणे : त्रिवेणी संगमावर अंघोळ केल्यानंतर रुममध्ये कपडे बदलत असलेल्या महिलांचे मोबाईलवर शुटिंग; पंडिताला अटक
पुणे : Lonikand Pune Crime News | त्रिवेणी संगमावर अंघोळ केल्यानंतर रुममध्ये कपडे बदलत असलेल्या महिलांचे मोबाईलवर शुटिंग केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथील पंडितच हे कृत्य करत असल्याचे आढळून आले आहे.
लोणीकंद पोलिसांनी अमोल विजय टोणगावकर Amol Vijay Tongaonkar (वय ३६, रा. बकोरी फाटा, वाघोली) अटक केली आहे. याबाबत एका २९ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलिसांकडे (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना तुळापूर येथील त्रिवेणी संगम (Triveni Sangam Tulapur) येथे मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. (Lonikand Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचे पती, दीर हे अमोल पंडित यांचे सांगण्यावरुन तुळापूर येथील त्रिवेणी संगम येथे गेले. फिर्यादी व त्यांचे पतीला पुजा झाल्यानंतर नदीत आंघोळ करुन आल्यानंतर फिर्यादीस पुजेच्या रुममध्ये कपडे बदलण्यास सांगितले. फिर्यादी त्या रुममध्ये कपडे काढत असताना भिंतीच्या कोपर्यात असलेल्या पंडितजीच्या बॅगेशेजारी उभा ठेवलेला एक मोबाईल फोन दिसला. त्यावेळी फिर्यादी यांनी तो मोबाईल हातात घेऊन पाहिला असता तो मोबाईल फोन पंडितजीचा असल्याचे फिर्यादीस समजले. त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉडिंग चालू होते. फिर्यादी यांची खात्री झाली की, पंडितजी याने त्यांचे नग्न अवस्थेतील चित्रीकरण करण्यासाठी त्याचे मोबाईलचे व्हिडिओ रेकॉडिंग चालू ठेवून भिंतीलगत मोबाईल उभा ठेवून त्यात रेकॉडिंग करुन विनयभंग (Molestation Case) केला. पोलिसांनी अमोल पंडित ऊर्फ टोणगावकर याला अटक केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”
Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून