Bopodi Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून युवकाच्या डोक्यात तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघांना अटक, बोपोडीतील घटना
पुणे : Bopodi Pune Crime News | पूर्ववैमनस्त्यातून दोघांनी महाविद्यालयीन युवकाच्या डोक्यात तलवारीने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Kill)
या घटनेत लेस्ली अलेक्झाडर चार्ली (वय २०, रा. कसाई मोहल्ला, जुना बाजार, खडकी) हा गंभीर जखमी झाला असून त्याने खडकी पोलिसांकडे (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. (Attempt To Murder)
त्यानुसार पोलिसांनी प्रतिक सपकाळे (वय २५, रा. गोपीचाळ, खडकी), तरुण सुरेश पिल्ले (वय ३३, रा. खडकी बाजार, खडकी) यांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर पूर्वीचेही गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लेस्ली हा १२ वीमध्ये शिकत आहे. प्रतिक सपकाळ याच्याबरोबर फिर्यादीची जानेवारीमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. त्यावेळी त्याने फिर्यादीच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन फिर्यादी हा पाच महिने तुरुंगात होता. त्यावेळी भांडण झाले तेव्हा प्रतिक याने फिर्यादीला तुझी एक दिवस विकेट टाकणार, मी तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. लेस्ली हा २६ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता दुचाकी वरुन खडकी बाजार येथे जात होता. त्यावेळी पाठीमागून प्रतिक व त्याचे दोन मित्र आले. त्यांनी मागच्या भांडणावरुन लेस्ली याला तुला लय मस्ती आली आहे, आज तुझा मर्डरच करुन टाकतो, असे म्हणून मारहाण करायला सुरुवात केली. तरुण पिल्ले याने त्याच्याजवळील तलवार काढून तुझे डोकेच फोडून ठार मारतो, असे बोलून फिर्यादीच्या डोक्यात वार केला. फिर्यादीने हाताने तो अडविला. तो वार कानाला लागून फिर्यादी गंभीर जखमी झाले. अल्पवयीन मुलाने दगडाने मारहाण केली. पोलीस निरीक्षक चोरमले तपास करत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”
Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून