Pune Crime Branch News | अल्पवयीन मुलाच्या ताब्यातून 7 वाहनचोरीचे गुन्हे उघड; अडीच लाखांचा माल जप्त

Pune Crime Branch

पुणे : Pune Crime Branch News | अल्पवयीन मुलगा पण त्याच्या करामती ऐकून पोलीस चकीत झाले. त्याने एक नाही तर तब्बल ७ वाहने चोरली (Arrest In Vehicle Theft). त्यात एक चारचाकी, ३ रिक्षा, ३ मोटारसायकलीचा समावेश आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला ७ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. (Vehicle Theft Detection)

विश्रामबाग पोलीस ठाण्यातील (Vishrambaug Police Station) वाहनचोरीचा समांतर तपास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक करत होते. पोलीस शिपाई साईकुमार कारके व पोलीस हवालदार धनंजय ताजणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अल्पवयीन मुलगा शनिवार पेठेत चोरलेल्या रिक्षासह थांबला आहे. त्याअनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे (API Praveen Kalukhe) व त्यांच्या सहकार्‍यांनी रिक्षासह थांबलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या नातेवाईकांना बोलावून त्यांच्यासमक्ष त्याने केलेल्या इतर वाहनचोरीच्या गुन्ह्यांबाबत चौकशी केली. त्यात त्याने ७ वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

वारजे पोलीस ठाणे ३ गुन्हे, विश्रामबाग पोलीस ठाणे, अलंकार पोलीस ठाणे (Alankar Police Station), राजगड पोलीस ठाणे (Rajgad Police Station), पौड पोलीस ठाण्यातील (Paud Police Station) प्रत्येकी एक असे ७ गुन्हे उघडकीस आले आहे. त्यात एक चारचाकी, ३ रिक्षा व ३ मोटारसायकलीचा समावेश असून अडीच लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या अल्पवयीन मुलाला पालकांच्या ताब्यात देऊन गुन्हे दाखल असलेल्या पोलीस ठाण्यात पालकांसोबत हजर राहण्याबाबत समजपत्र देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (Pingle Nikhil DCP), सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे (Ingle Ganesh ACP)
यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई (PI Nandkumar Bidwai)
यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, पोलीस हवालदार गणेश ढगे, बाळू गायकवाड,
धनंजय ताजने, पोलीस अंमलदार रवींद्र लोखंडे, महेश पाटील, साईकुमार कारके, महिला पोलीस हवालदार वारे,
पोलीस अंमलदार बनकर यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”

Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून

Malabar Gold & Diamonds | मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला 2023-24 साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स’ पुरस्काराने केले सन्मानित

Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान