Pune Pimpri Chinchwad Crime News | नवविवाहितेची सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या ! सासरी होत होता छळ, चार महिन्यात संपविले आयुष्य
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News लग्नातील मानपानावरुन सासरी होणार्या छळाला कंटाळून नवविवाहितेने सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. (Newly Married Woman Suicide)
खुशबु केशरीनंदन कर्ण (वय ३०, रा. कोहिनूर सफायर, रामनगर, ताथवडे) असे या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडिल प्रदिप नारायणराव जमीनदार (वय ६८, रा. इंदोर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती केशरीनंदन तेजनारायणलाल कर्ण (वय ३३), शिला तेजनारायणलाल कर्ण आणि तेजनारायणलाल कर्ण यांना अटक केली आहे. ही घटना ताथवडे येथील कोहिनूर सफायर या सोसायटीत २८ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा आठ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशबु हिचा चार महिन्यांपूर्वी केशरीनंदन याच्याबरोबर विवाह झाला होता. लग्नात मानपान केला नाही, जास्त वस्तू आणलेल्या नाहीत, असे म्हणून तिच्यावर घरातील प्रांपचिक कारणावरुन शारिरीक व मानसिक छळ केला जात होता. तिला हाताने मारहाण केली जात असे. तिला कोठेही घराबाहेर जाऊ न देता तिच्यावर पाळत ठेवून संशय घेतला जात होता. या छळाला कंटाळून तिने सहाव्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीमधून उडी मारुन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Warje Malwadi Pune Crime News | ‘गाडी नीट चालवता येत नाही’ म्हणून तिघांनी केली दोघा भावांना मारहाण