FIR On Amit Anil Lalwani | मुठा कालव्याची सरंक्षण भिंत पाडून बिल्डरने वाहतूकीसाठी बांधला सिमेंट काँक्रीटचा रस्ता; बिम्स अँड शाईन रिअल्टीस कंपनीच्या अमित ललवाणीवर गुन्हा दाखल

swargate police

पुणे : FIR On Amit Anil Lalwani | गुलटेकडी येथील पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) मुठा उजवा कालव्याच्या (Mutha Ujwa Kalwa) सुरक्षितेसाठी बांधलेली सीमा भिंत पाडून बिल्डरने बांधकामासाठी लागणारे साहित्याची वाहतूक करण्यासाठी सिमेंटचा कॉक्रीटचा रस्ता तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी बिम्स अँड शाईन रिअल्टीजचे (Beams & Shine Realties Private Limited) अमित अनिल ललवाणी (Amit Anil Lalwani) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी रोहन ढमाले यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिम्स अँड शाईन रिअल्टीज या कंपनीकडून अमित ललवाणी यांनी अप्सरा टॉकीजसमोरील सर्वे नं. ७२९ /१/अ गुलटेकडी (Gultekdi Irrigation Department Office) येथील जागेवर बांधकाम करण्याकरीता शासनाच्या जागेचा वापर करण्याकरीता ना हरकत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी अर्ज केला होता.

त्यानुसार वरिष्ठांनी पाहणी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश फिर्यादी यांना दिला होता.
फिर्यादी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता ललवाणी याने त्यांच्या प्लॅटवर जाण्यासाठी मुठा उजवा कालव्या लगत
अंदाजे १२मीटर रुंद व ३०० मीटर लांब अंतराचा सिमेंट कॉक्रीटचा पक्का रस्ता तयार केला होता.
पाटबंधारे विभागाने कालव्याच्या सुरक्षिततेसाठी बांधलेल्या सीमा भिंतीपैकी ६३ मीटर लांब,
५ मीटर उंच व ०़३० मीटर रुंदीची भिंत पाडून २ लाख ८७ हजार रुपयांचे नुकसान केले.
त्या जागेतून विना परवानगीने बेकायदेशीररित्या प्रवेश करुन बांधकामास लागणारे साहित्याची वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. तसा अहवाल फिर्यादी यांनी वरिष्ठांना सादर केला.

त्याबाबत सांगितल्यानंतरही त्यांनी बेकायदेशीरपणे वाहतूक चालू ठेवल्याने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील (PSI Ashok Patil) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

You may have missed