Hinjewadi Pune Crime News | ‘गुड टच-बॅड टच’ कार्यक्रमातून दुकानदाराच्या करामती आल्या समोर; स्वीट मार्ट दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी : Hinjewadi Pune Crime News | ती गेल्या तीन महिन्यांपासून स्कुल बसने शाळेत जात असत. त्यावेळी उत्तम स्वीटमधील दुकानदार दुकानात बसून तिला फ्लॉईंग किस (Flying Kiss) देत असे व अश्लिल शारीरीक चाळे करुन दाखवत असे. मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांपासून मुलींनी सावधानता कशी बाळगायची हे शाळेत गुड टच बॅड टच (Good Touch & Bad Tounch) कार्यक्रमाद्वारे समजावून सांगण्यात येत होते. यावेळी या पिडित मुलीने आपल्याबाबतही हा स्वीट मार्टमधील काका अशाच हरकती करत असल्याचे सांगितले. त्यानंतर हिजंवडी पोलिसांनी या दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे.
पूनाराम मोतीची चौधरी (वय ३५, रा. कोठडी तहसील, देसुरी, जि. पाली, राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार महाळुंगे येथील उत्तम स्वीटमध्ये १जून २०२४ पासून २० ऑगस्ट २०२४ पर्यंत सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित फिर्यादी ही मागील तीन महिन्यांपासून तिचे स्कुल बसने सकाळी साडेसात वाजता वाकड येथे जात असते. उत्तम स्वीटचा मालक चौधरी हा त्याच्या दुकानात बसून पिडिता कोठे बसली आहे, हे पाहून पिडिताकडे पाहून फ्लॉईंग किस करत असे. त्याचे हात त्याच्या स्वत:च्या छातीजवळ घेऊन हातवारे करत असे. तसेच पिडिताशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. पिडितास तिच्या शाळेत गुड टच बॅड टच कार्यक्रमात वाकड पोलीस ठाण्याच्या (Wakad Police Station) पुनम बारवकर या माहिती देत होत्या. त्यावेळी पिडिताने शाळेत सर्वांसमोर उत्तम स्वीट वाले काका करत असलेल्या हरकतीबाबत सांगितले. त्यानंतर दोन महिला पोलीस पिडितेच्या घरी जाऊन पिडिताचे वडिल यांना उत्तम स्वीट येथे घेऊन गेले. त्यावेळी या मुलीने हातवारे करणार्या पूनाराम चौधरी याला ओळखले. तिच्या वडिलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक झोल तपास करीत आहेत. (Hinjewadi Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद