Pune ACB Trap | 35 हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
पुणे : Pune ACB Trap | फौजदारी गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस अंमलदार यांना सापळा रचून रंगेहाथ पकडले. (Pune Bribe Case)
सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील तुळशीदास मगर Sunil Tulsidas Magar (वय ५५), पोलीस अंमलदार सागर कैलास गाडेकर Sagar Kailas Gadekar (वय ३४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी, तक्रारदार यांच्याविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात (Vadgaon Maval Police Station) फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनिल मगर (ASI Sunil Magar) याच्याकडे देण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात योग्य ती मदत करण्यासाठी सुनिल मगर व सागर गाडेकर यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली.
त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Pune Anti Corruption Bureau) तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी बुधवारी करण्यात आली. त्यात तडजोडीअंती ३५ हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले. त्यानंतर वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीत सापळा रचण्यात आला. सुनिल मगर व सागर गाडेकर यांनी तक्रारदाराकडून ३५ हजार रुपये स्वीकारताना दोघांना पकडण्यात आले. वडगाव मावळ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (Shirish Sirdeshpande), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Shital Janve)
यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (PI Shreeram Shinde) तपास करीत आहेत. (Pune ACB Trap)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Gultekdi Pune Crime News | पुणे : गुलटेकडीमध्ये मध्यरात्री तरुणावर वार करुन निर्घुण खुन;
भावाला वाचवायला गेला आणि जीव गमावला, 5 जणांना अटक