Sanjay Raut | राष्ट्रवादीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह? संजय राऊतांचा अमित शाह-प्रफुल पटेलांवर थेट निशाणा

Sanjay Raut | This is not 'Nari Shakti Vandana', this is an election slogan; Sanjay Raut's blunt attack on the central government over women's reservation

मुंबई :  Sanjay Raut | राज्यातील राजकारणात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर गंभीर आरोप केले. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे नियंत्रण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात नसून, थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रभावाखाली गेले आहे, असा दावा त्यांनी केला.

राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्यावरही टीका करत, ते जे बोलतात ते प्रत्यक्षात अमित शाह यांच्या भूमिकेशी जुळते, असे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होण्याची शक्यता नसून, उलट अजित पवार गट भविष्यात भाजपमध्ये विलीन होऊ शकतो, असा राजकीय अंदाजही त्यांनी व्यक्त केला. या विधानांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतही प्रश्न उपस्थित केले. या दुर्घटनेचा संपूर्ण आणि पारदर्शक तपास होणार का, असा सवाल करत संबंधित विमान कंपनीमागे अदृश्य हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आणि बेनामी मालक कोण आहे, याची चौकशी करण्याची मागणी केली.

राऊत यांच्या मते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात अंतर्गत मतभेद तीव्र झाले असून काही नेत्यांवर कुटुंबीयांकडूनही आरोप होत आहेत. संबंधितांनी पुराव्यांसह भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन त्यांनी केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यासंदर्भात राजकीय चर्चांना वेग आला असून, आगामी काळात राज्यातील सत्तासमीकरणांवर त्याचे परिणाम दिसू शकतात.

You may have missed