MVA CM Candidate Issue | शरद पवारांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाची मवाळ भूमिका; मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला

Mahavikas Aghadi

मुंबई : MVA CM Candidate Issue | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून महायुती आणि महाविकास आघाडीने (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) रणनीती ठरवत तयारी सुरु केलेली आहे. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. तसेच, महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेकडून (Shivsena UBT) वारंवार मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची घोषणा केली जावी, अशी मागणी केली जात आहे.

उद्धव ठाकरे सुद्धा मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. याबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अनेकदा भाष्य केले आहे. तर काँग्रेसकडूनही नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील (Jayant Patil) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत याबाबत शरद पवारांना (Sharad Pawar) प्रश्न विचारला असता त्यांनी त्याबाबत भाष्य केले.

ते म्हणाले, “मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत आताच आग्रह धरण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्रीपदाबाबतीत महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. आकड्यांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा कोण होणार हे ठरणार आहे. मुख्यमंत्री कोण? हे आता महत्त्वाच नाही.

सध्या महाविकास आघाडीला बहुमत मिळेल अशी स्थिती आहे. तसे वातावरण राज्यात आहे. तसेच, लोकांच्या पाठिंब्यानंतर एक स्थिर सरकार देणं महत्त्वाचं आहे. स्थिर सरकार देणं, हे आमचे उद्दिष्ट्य आहे “, असे म्हणत संख्याबळ आल्यानंतर नेतृत्व कुणी करायचे, याचा निर्णय होईल असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

काँग्रेसकडूनही शरद पवारच्या या वक्तव्याला अनुमोदन देण्यात आले. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाची भूमिका मवाळ झाल्याचे चित्र आहे. ठाकरे गटाने मवाळ भूमिका घेत आमचं सर्वात आधी काम हे भ्रष्ट सरकार हटवणं आहे. मुख्यमंत्रिपदावर कधीही चर्चा होऊ शकते, असे भाष्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, जनतेच्या मनात जो चेहरा त्यालाच जनता मुख्यमंत्री बनवते.
शरद पवारांचे विधान शतप्रतिशत ठीक आहे. तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडी आहे.
कोण किती जागा जिंकते त्यानंतर हे ठरवलं जाईल. परंतु महाविकास आघाडीला बहुमत मिळतंय.

आमचं सर्वात आधी काम हे भ्रष्ट सरकार हटवणं हे आहे.
आम्ही मुख्यमंत्रिपदावर कधीही चर्चा करू शकतो असं त्यांनी माध्यमांना सांगितले.
त्यामुळे ठाकरे गटाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा ही आग्रहाची मागणी काँग्रेस आणि
शरद पवारांच्या भूमिकेनंतर सोडली अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Gultekdi Pune Crime News | पुणे : गुलटेकडीमध्ये मध्यरात्री तरुणावर वार करुन निर्घुण खुन;
भावाला वाचवायला गेला आणि जीव गमावला, 5 जणांना अटक

Pune Crime News | सुधीर गवस खुनाचा बदला घेण्यासाठी खूनाचा प्रयत्न करुन फरार झालेला गुंड जेरबंद (Video)

You may have missed