Maharashtra Assembly Election 2024 | महाराष्ट्र विधानसभा जिंकण्यासाठी मध्यप्रदेशनंतर गुजरातची मदत; अमित शहांनी घातले लक्ष

Amit Shah

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. लोकसभेला भाजपला मतदारांनी नाकारल्याने अपेक्षित आकडा भाजपला गाठता आला नाही. विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने (BJP) परराज्यातील नेते महाराष्ट्रात बोलवले आहेत. मध्यप्रदेशातील नेत्यांनंतर गुजरातमधील नेते महाराष्ट्रात ठाण मांडून मतदारसंघाचा आढावा घेत आहेत.

गुजरातमधील आजी-माजी आमदारांनी नाशिकमध्ये आढावा बैठक घेतली. हे नेते अमित शहा (Amit Shah) यांच्या मर्जीतील आहेत. महाराष्ट्र जिंकण्यासाठी गुजरात भाजपच्या नेत्यांची खास टीम तयार करण्यात आली आहे.

हे नेते मतदारसंघानिहाय आढावा घेत आहेत. ४८ मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या गुजरातच्या नेत्यांप्रमाणे अन्य राज्यातील नेत्यांवरही जबाबदारी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटा नॅरेटिव्ह सेट केला. त्याचा मोठा फटका भाजपला बसला होता.
त्यामुळे हे नॅरेटिव्ह खोडून काढण्याची जबाबदारी देखील या नेत्यांवर असणार आहे.

या नेत्यांना पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करायची आहे. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना सक्रिय करायचे आहे.
बूथ पासून वरच्या कमिट्यांपर्यंत आढावा घ्यायचा आहे. त्याचबरोबर पक्षातील अंतर्गत वाद,
उमेदवाराबाबतचा लोकांचे मत याचे रिपोर्टींग वरिष्ठांना करावे लागणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MVA CM Candidate Issue | शरद पवारांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाची मवाळ भूमिका; मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला

Jaydeep Apte Arrest | शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक; जयदीप कसा पकडला गेला जाणून घ्या

Hadapsar Pune Crime News | अट्टल वाहनचोराकडून साडेबारा लाखांच्या तब्बल 24 दुचाकी हस्तगत; हडपसर पोलिसांची कामगिरी

Pune ACB Trap | 35 हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

You may have missed