Bibvewadi Pune Crime News | उलटी करणे 4 वर्षाच्या मुलाच्या जीवावर बेतले ! आईच्या प्रियकराच्या मारहाणीत मृत्यु, बिबवेवाडी पोलिसांच्या कौशल्याने खुनाचा गुन्हा उघड

Bibvewadi Police Station

पुणे : Bibvewadi Pune Crime News | जेवल्यानंतर त्याला उलटी झाली, पण ही उलटी त्याच्या जीवावर बेतणार याची त्या चार वर्षाच्या लहानग्याला जरा सुद्धा कल्पना नव्हती. डॉक्टरांचा ”अनेक जखमांमुळे मृत्यु” या शवविच्छेदनाचा अहवालाच्या आधारे बिबवेवाडी पोलिसांच्या (Bibvewadi Police Station) कौशल्याने ४ वर्षाच्या मुलाच्या खूनाचा हा प्रकार उघडकीस आला.

वेदांश विरभद्र काळे (वय ४, रा. राजीव गांधीनगर, अप्पर बिबवेवाडी) असे मृत्यु पावलेल्या मुलाचे नाव आहे. नाशिक शहरातच या मुलाचा मृत्यु झाला असताना त्याला पुण्यात आणून बेशुद्ध असल्याचे भासवून गुन्हा लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

पल्लवी विरभद्र काळे (वय २४, रा. अप्पर बिबवेवाडी) या त्यांचा चार वर्षाचा मुलगा वेदांश काळे याला घेऊन कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये (Kamala Nehru Hospital) २ सप्टेबर रोजी गेल्या होत्या. आपण कामावर गेलो असताना तो घरात कॉटवरुन पडला असे तिने डॉक्टरांना सांगितले. त्याच्या हाताला प्लॅस्टर होते. लोणावळा येथे टेरेसवरुन पडल्यामुळे हाताला प्लॅस्टर आहे, असे सांगितले. डॉक्टरांनी तपासल्यावर उपचारापूर्वी मृत्यु झाल्याचे घोषित केले.

शवविच्छेदनात डॉक्टरांनी अनेक जखमांमुळे मृत्यु असा अहवाल दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे (PI Mangal Modhave) यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव (PSI Shashank Jadhav) व पोलीस अंमलदार विजय लाड, अंकुश केंगले, नितीन धोत्रे व महिला पोलीस अंमलदार आदिती बहिरट यांनी मुलाच्या आईकडे चौकशी सुरु केली. ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. पोलिसांनी वसाहतीमध्ये चौकशी केली. नातेवाईकांकडे चौकशी केली. तेव्हा गेल्या तीन महिन्यांपासून पल्लवी काळे येथे रहात नसून ती नाशिकला राहते. तिचे महेश कुंभार याच्याबरोबर प्रेम संबंध असल्याची माहिती मिळाली. ही माहिती समोर आल्यावर पल्लवी काळे हिला खरे सांगण्या शिवाय पर्यायच नव्हता.

१ सप्टेबर रोजी रात्री ११ वाजता वेदांश हा जेवल्यानंतर त्याने उलटी केली. त्याचा राग येऊन महेश कुंभार याने वेदांश याला हाताने व झाडूने मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला प्रथम नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यानंतर तेथून त्यास पल्लवी व महेश याने पुण्यातील कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये आणले.

पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महेश कुंभार याने केलेल्या मारहाणीमुळेच वेदांश याचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाल्याने खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तो नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
महेश कुंभार यांचा तांत्रिक विश्लेषण व पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने तो नाशिकमध्ये असल्याची खात्री झाली.
पंचवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil), पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja),
सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे (ACP Dhanyakumar Godse)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे (PI Manojkumar Londhe),
पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, विवेक सिसाळ, पोलीस अंमलदार विजय लाड,
अंकुश केंगले, नितीन धोत्रे, विशाल जाधव, संजय आंग्रे, अजय कामठे व आदिती बहिरट यांनी केली आहे. (Bibvewadi Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MVA CM Candidate Issue | शरद पवारांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाची मवाळ भूमिका; मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला

Jaydeep Apte Arrest | शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक; जयदीप कसा पकडला गेला जाणून घ्या

Hadapsar Pune Crime News | अट्टल वाहनचोराकडून साडेबारा लाखांच्या तब्बल 24 दुचाकी हस्तगत; हडपसर पोलिसांची कामगिरी

Pune ACB Trap | 35 हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

You may have missed