Viman Nagar Pune Crime News | स्पाईस जेट एअरलाईन्सच्या कर्मचार्यांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर
पुणे : Viman Nagar Pune Crime News | लोहगाव विमानतळावरील (Pune Lohegaon Airport) स्पाईस जेट एअरलाईन्सच्या कर्मचार्यांवर गुन्हा दाखल होण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशाच्या सामानातून रोकड चोरीला गेल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अर्जुन धोंडिबा जगताप (वय ४७, रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार लोहगाव विमानतळावर स्पाईस जेट विमान नं. एस जी ५२ मध्ये मंगळवारी रात्री बारा वाजून १० ते पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे स्पाईस जेट विमानाने दुबईहून लोहगाव विमानतळावर उतरले. त्याची लगेज बॅग पट्ट्यावरुन बॅग आली तेव्हा बॅगचे लॉक तुटलेले दिसून आले. त्यामुळे बॅगेचे १० हजार रुपयांचे नुकसान झाले.
त्यांनी बॅगेमधील सामानाची तपासणी केली.तेव्हा बॅगेमध्ये ठेवलेली ७ हजार रुपयांची रोकडे चोरीला गेलेली दिसून आली.
याबाबत विमान कंपनीच्या वतीने काहीही खुलासा न झाल्याने जगताप यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून
पोलीस उपनिरीक्षक गणेश साळुंखे (PSI Ganesh Salunkhe) तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा