Vanraj Andekar Murder | दीड महिन्यांपासून रेकी; वनराज आंदेकरच्या हत्येसाठी ३ पिस्तुलांचा वापर; मर्डर करून कुठल्या रस्त्याने पळून जायचं याचाही प्लॅन
पुणे : Vanraj Andekar Murder | पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंदेकर यांच्या हत्येसाठी दीड महिन्यांपूर्वीच कट रचला होता. त्याच्या हत्येसाठी आरोपींनी संपूर्ण तयारी करूनच हत्या केली.
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, दीड महिन्यांपासून वनराज यांच्यावर हल्लेखोरांचे लक्ष होते. वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी ३ पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता. वनराज यांच्यावर हल्ला करण्यासाठी सोमनाथ गायकवाड (Somnath Gaikwad), अनिकेत दुधभाते (Aniket Dudhbhate), जयंत कोमकर (Jayant Komkar) यांनी प्लॅन आखला होता. सोमनाथ गायकवाडने अनिकेत दुधभातेला या हल्ल्याची माहिती दिली होती.
रविवारी दुपारी वनराज आंदेकर यांच्यावर हल्ल्याचा प्लॅन आखला गेला आणि रात्री आंदेकर यांच्यावर हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली. अनिकेत दुधभातेने इतर आरोपींची जुळवाजुळव केली. त्यानंतर त्यांना घेऊन तो नाना पेठेत आला (Murder In Nana Peth Pune). तेथे वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या तसेच कोयत्याने वार (Koyta Attack) केले.
आंदेकर यांच्यावर हल्ला केल्यानंतर कुठल्या रस्त्याने पळून जायचं याची देखील आरोपींनी अगोदरच तयारी करून ठेवली होती.
आरोपी दुचाकीवरून आले आणि दुचाकीवरूनच पळून गेले.
या हत्या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. (Vanraj Andekar Murder)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा