Pune Crime Branch News | खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यातील आरोपी 2 तासात जेरबंद

pune-police-arrest

पुणे : Pune Crime Branch News | पूर्ववैमनस्यावरुन तरुणावर वार करुन पळून गेलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने वारजे येथे पकडले. हर्षद संदीप वांजळे Harshad Sandeep Wanjale (वय १८, रा. औदुंबर कॉलनी, वारजे) असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

तरुणावर वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) दाखल आहे. त्यातील घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज हवेली पोलिसांनी सर्वत्र पाठविले होते. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना बातमी मिळाली की, खुनाचा प्रयत्न करुन पळून गेलेले आरोपी वारजेमधील असून नर्‍हे येथील बंद पडलेल्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नर्‍हेमधून दोघांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईकरीता त्यांना हवेली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अंमलदार हवालदार प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, बाळु गायकवाड, पोलीस नाईक रवींद्र लोखंडे, साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MVA CM Candidate Issue | शरद पवारांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाची मवाळ भूमिका; मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला

Jaydeep Apte Arrest | शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक; जयदीप कसा पकडला गेला जाणून घ्या

Hadapsar Pune Crime News | अट्टल वाहनचोराकडून साडेबारा लाखांच्या तब्बल 24 दुचाकी हस्तगत; हडपसर पोलिसांची कामगिरी

Pune ACB Trap | 35 हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

You may have missed