Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – ‘…म्ह्णून दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरावं लागतंय’

Eknath-Shinde-Uddhav-Thackeray

मुंबई : Eknath Shinde On Uddhav Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. पक्षांमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरु झालेल्या आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) असा सामना होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

बाळासाहेबांचे विचार सोडल्याने आज उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरावं लागतंय असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. त्याशिवाय मालवण प्रकरणी राजकारण करणं दुर्दैवी आहे. सातत्याने आरोप करणाऱ्या संजय राऊतांनी ठाण्यातील एका रुग्णालयात दाखल व्हावं,असंही माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मालवण प्रकरणी कुणालाही सरकार सोडणार नाही. दोषींना कठोर शिक्षा होईल. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबाबत श्रद्धा, झालेली घटना दुर्दैवी आहे आणि त्यावर राजकारण करणे त्याहून दुर्दैवी आहे. जयदीप आपटे असो वा अन्य कुणीही कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. तो कुठेही असेल त्याला पकडू असे मी म्हंटले होते आणि आता त्याला पकडले आहे, असं शिंदेंनी सांगितले. (Malvan Shivaji Maharaj Statue Collapsed)

त्याशिवाय विरोधक जे राजकारण करत होते त्यांना जयदीप आपटे अटकेनंतर चपराक मिळाली आहे. जयदीप आपटेची चौकशी होऊन कारवाई होईल. ही घटना दुर्दैवी होती मात्र त्यावर विरोधकांनी राजकारण केले. सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा लवकरात लवकर पुन्हा तिथे उभारेल हे आमचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी संजय राऊतांवर (Sanjay Raut) पत्रकारांनी प्रश्न विचारला असता
त्यांना ठाण्यातील एका रुग्णालयात उपचाराची गरज आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.
दरम्यान, जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा दिल्लीहून नेते इथं यायचे आता उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या गल्लीगल्लीत जावं लागतंय,
मला मुख्यमंत्री करा असं सांगावे लागतेय हे पाहून बाळासाहेबांनाही दुःख होत असेल.

बाळासाहेबांचा विचार सोडल्यानंतर अशी परिस्थिती झाली आहे.
आम्ही बाळासाहेबांचा विचार, आनंद दिघेंचा विचार घेऊन पुढे जातोय. राज्याचा विकास करतोय.
राज्यात कल्याणकारी योजना ही आणत आहोत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Eknath Shinde On Uddhav Thackeray)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MVA CM Candidate Issue | शरद पवारांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाची मवाळ भूमिका; मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला

Jaydeep Apte Arrest | शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक; जयदीप कसा पकडला गेला जाणून घ्या

Hadapsar Pune Crime News | अट्टल वाहनचोराकडून साडेबारा लाखांच्या तब्बल 24 दुचाकी हस्तगत; हडपसर पोलिसांची कामगिरी

Pune ACB Trap | 35 हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

You may have missed