Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीतच वाद; शिंदे गटाच्या नेत्यांची अजित पवारांबाबत तक्रार; मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीसांची मध्यस्थी
मुंबई : Ladki Bahin Yojana | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सर्वच पक्षांनी सुरु केलेली आहे. लोकसभेला फटका बसल्यानंतर महायुतीने (Mahayuti News) आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. दरम्यान महायुती सरकारने (Mahayuti Govt) निवडणुका डोळ्यासमोर ठेवत काही योजनाही जाहीर केल्या. त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यभर चर्चा आहे. मात्र या योजनेवरून महायुतीतच वाद असल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताना अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) महायुतीचा उल्लेख न होता वैयक्तिक पक्षाचा उल्लेख होत असल्याचा आरोप महायुतीतील इतर पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. या योजनेचा प्रचार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोटो न वापरणे, योजनेच्या नावातून मुख्यमंत्री हा शब्दच काढून टाकणे, असे अजित पवार गटाकडून केले जात असल्याची तक्रार शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी बैठकीत केली आहे. (Shivsena Shinde Group)
अजित पवार गटाकडून या योजनेचा प्रचार करत असताना मुख्यमंत्री शिंदे यांना डावलण्याचा प्रयत्न होत असल्याच्या बातम्या गेले काही दिवस येत आहेत. शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), दादा भुसे (Dada Bhuse), तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी याबद्दल बैठकीत तीव्र नापसंती व्यक्त केली. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर होते.
मात्र, शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी ‘लाडकी बहीण’ चा विषय काढून नाराजीचा सूर लावला. ‘ही योजना महायुती सरकारची आहे, तिन्ही पक्षांनी हा निर्णय घेतलेला आहे. असे असताना तो केवळ अजित पवार यांनीच घेतला आणि त्यांच्यामुळेच महिलांना महिन्याकाठी १५०० रुपये मिळत असल्याच्या जाहिराती अजित पवार गटाकडून केल्या जात आहेत, हे योग्य नाही,’ असे म्हणत शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी बोलायला सुरुवात केली.
महायुतीतील एकाच पक्षाने या योजनेचे श्रेय घेणे योग्य नाही, आम्ही तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा आवर्जून उल्लेख करतो, असे शंभूराज देसाई म्हणाले. यावर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सांगितले, की आमच्या पक्षाचा श्रेयवादाचा कुठलाही हेतू नाही. कोणाला कमी लेखण्याचा यात हेतू नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी मध्यस्थी केली. योजना मुख्यमंत्र्यांच्या नावे आहे,
तेव्हा या पदाचा उल्लेख योजनेचा प्रचार करताना केला गेला पाहिजे.
आपण तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे घेतलेल्या या निर्णयाचे तिघांनाही श्रेय आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर वादावर पडदा पडला. (Ladki Bahin Yojana)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी