Dharmarao Baba Atram On Sharad Pawar NCP | पक्षफोडी करणारा पक्ष आता माझं घर फोडण्याचं काम करतोय; धर्मरावबाबा आत्राम यांचा आरोप

Bhagyashree Atram-Dharmarao Baba Atram

ऑनलाइन टीम – Dharmarao Baba Atram On Sharad Pawar NCP | राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटावर नाव न घेता खरमरीत टीका केली आहे. चंद्रपुरात एका कार्यक्रमात त्यांनी म्हटले की, विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. पक्षफोडी करणारा पक्षच आता माझं घर फोडण्याचं काम करतोय. माझ्याकडे दुधारी तलवार आहे. माझ्या वाटेला गेलात तर म्यानमधून तलवार बाहेर काढणार.

धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री ही परस्पर विरोधी शरद गटाकडून लढणार असल्याचा दावा केला गेला. या दाव्यामुळे वडिलांविरुद्ध मुलगी मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. पण जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमच्या पक्षाची कशी होणार आहे. माझ्याकडे दुधारी तलवार आहे, माझ्या वाटेला गेलात तर म्यानमधून तलवार बाहेर काढणार. एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे. आत्राम घराणं हलगेकर (मुलगी आणि जावई) यांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही.

माझ्या खुर्चीवर बसण्याच पाहणाऱ्यांना बाजूला करणार

आत्राम म्हणाले, जे माझ्या खुर्चीवर बसण्याच पाहतील त्यांना बाजूला करण्याचे काम मी करणार आहे. मी या भूमीतील गरीब आणि श्रीमंत अशा सर्व लोकांना सर्वांना समान न्याय दिला आहे. मी सतत काम करत आलो आहे. आता हे मध्येच येऊन हे अशा प्रकारचे वातावरण तयार करत असतील तर त्यांना वाट लावायचे काम आपल्याला करायचे आहे.
मी इमाने इतबारे काम केले. 50 वर्षे या भूमीचे रक्षण करण्याचे काम केले आहे.
शेवटचा श्वास असेपर्यंत मी काम करत राहणार आहे. एक गेला तरी कुटुंबाची संपूर्ण फौज आज माझ्यामागे उभी आहे. (Dharmarao Baba Atram On Sharad Pawar NCP)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed