Pune Crime News | मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा धक्कादायक प्रकार ! कामगाराच्या मृत्युवर खंडणी घेणारा कामगार नेता जेरबंद

पुणे : Pune Crime News | मृताच्या टाळूवरील लोणी खाणे अशी एक म्हण आपल्याकडे आहे. त्याचा प्रत्यय नुकताच आला. काम करत असताना इमारतीवरुन पडून कामगाराचा मृत्यु झाला. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची व पोलीस आयुक्तालयासमोर (CP Office Pune) आंदोलन करण्याची धमकी देऊन एका कामगार नेत्याने २ लाख रुपयांची खंडणी (Demand Extortion Money) मागितली. त्यातील अॅडव्हान्स म्हणून २० हजार रुपये स्वीकारताना पोलिसांनी सापळा रचून या कथित कामगार नेत्याला जेरबंद केले आहे.
https://www.instagram.com/p/DAVGuX5J6j4
नामदेव भिमराव घोरपडे Namdev Bhimrao Ghorpade (वय ४४, रा. सुपर बिबवेवाडी) असे या कथित कामगार नेत्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे.
https://www.instagram.com/p/DAU81-6pXAq
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बांधकाम साईटवर काम करताना इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यु झाला होता. नामदेव घोरपडे याची एक कामगार संघटना आहे. या संघटनेच्या नावाखाली त्याने फिर्यादीशी संपर्क साधला. फिर्यादी यांच्यावर सदोषमनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची व पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याची भिती घातली. हे करु नये, यासाठी २ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर तडजोडी अंती दीड लाख रुपये घेण्याचे मान्य केले.
https://www.instagram.com/p/DATgSDjpGhj
फिर्यादी यांनी पोलिसांशी संपर्क साधून खंडणी मागत असल्याची तक्रार दिली. पोलिसांच्या सांगण्यानुसार फिर्यादी यांनी खंडणीच्या रक्कमेतील २० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता पैसे घेण्यासाठी नामदेव घोरपडे हा सातारा रोडवरील कात्रज डेअरीचे आवारात आला. तेव्हा अगोदरच सापळा रचून थांबलेल्या भारती विद्यापीठ पोलिसांनी पैसे घेताना त्याला रंगेहाथ पकडले. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत. (Pune Crime News)
https://www.instagram.com/p/DATfFZ2pdbr
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”