Pune Crime News | ग्रामपंचायतीचा बनावट रहिवासी दाखला तयार करुन रेशन कार्ड, जातीचा दाखला  तयार करुन घेतला शासकीय योजनांचा लाभ, एकावर गुन्हा दाखल

Pune Crime News | Case registered against an individual for obtaining a ration card and caste certificate—and subsequently availing benefits of government schemes—by creating forged Gram Panchayat documents.

पुणे : Pune Crime News |  ग्रामपंचायतीचा  रहिवासी दाखला  तयार करुन बनावट कागदपत्रांचा वापर करुन शिधापत्रिका, जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करुन शासकीय योजनांचा लाभ घेतल्याच्या आरोपातून एकावर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या पोलीस उपअधीक्षक सई भोरे पाटील यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ज्ञानेश्वर बबन शेळके Dnyaneshwar Baban Shelke (रा. महाळुंगे, ता़ मुळशी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील कोलतावडे ग्रामपंचायत सरंपच व विठ्ठल मारुती शेळके यांनी ज्ञानेश्वर बबन शेळके यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज केला होता. त्यात ज्ञानेश्वर बबन शेळके हे कोलतावडे येथील रहिवासी नसून त्यांनी विठ्ठल मारुती शेळके यांच्या कुटुंबातील पुरावे जोडून बोगस जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन सरकारी सेवेचा लाभ घेत आहे, अशी तक्रार केली होती. याची सत्यता पडताळणी करण्याकरीता समितीने हे प्रकरण २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस दक्षता पथकाकडे हस्तांतरीत केले होते.

चौकशीत ज्ञानेश्वर बबन शेळके यांनी कोलतावडे येथील ८ अ उतारा बनावट तयार केला. तसेच बनावट शिक्क्यांचा वापर करुन रहिवासी दाखले तयार केले. त्याचा वापर करुन शिधापत्रिका, जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले. त्यानंतर विठ्ठल मारुती शेळके यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या शालेय व महसूल नोंदी  वापरुन ५ मार्च २०१६ रोजी अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती येथे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केले असल्याचे दिसून आले. तसा सविस्तर अहवाल १९ जून २०२६ रोजी समितीस सादर केला. त्यानंतर समितीने सुनावणी घेऊन २२ सप्टेंबर २०२६ रोजी निर्णय दिला. त्यामध्ये ज्ञानेश्वर बबर शेळके यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कोळी महादेव अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याचे सिद्ध झाले आहे.

त्यामुळे त्यांचा कोळी महादेव अनुसुचित जमातीचा दावा अवैध ठरविण्यात येत आहे. त्यांचा दाखला  रद्द व जप्त करण्यात येत आहे, असे आदेश निर्गमित केले. अनुसुचित जमाती तपासणी समितीने सई भोरे पाटील यांना गुन्हा दाखल करण्यासाठी आदेशित केले. त्यानुसार त्यांनी फिर्याद दिली असून ज्ञानेश्वर बबन शेळके यांनी रहिवासी दाखला  असे लेटर असलेला त्यांच्या पत्नी सुरेखा ज्ञानदेव शेळके यांचा फोटो असलेला त्याच्यावरती कोलतावडे ग्रामपंचायतीचा बनावट गोल शिक्का असलेला रहिवासी दाखल्याच्या खाली सरपंच/ग्रामसेवक यांच्या १२ जुलै २०१६ रोजी बनावट सही शिक्के तयार करुन रहिवासी दाखला तयार केला. तो खोटा आहे, हे माहिती असताना दोन्ही दाखले खरे आहते, असे भासवुन शासकीय कार्यालयात सादर करुन त्याचा वापर करुन शासकीय सेवेत लाभ घेतलेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करीत आहेत.

You may have missed