Pune District Court To Swargate Metro | ‘मेट्रो पुणेकरांसाठी आहे की पंतप्रधानांच्या उद्घाटनासाठी?’ पुणेकरांचा संतप्त सवाल; उदघाटन नसल्याने सेवाही राहणार बंद !
पुणे: Pune District Court To Swargate Metro | पाऊस आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने पंतप्रधान मोदींचा नियोजित पुणे दौरा रद्द झाल्याची माहिती आहे (PM Modi Pune Visit Cancelled). पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे आज उदघाटन करण्यात येणार होते.
दरम्यान, आता ‘महामेट्रो’कडून स्वारगेट ते जिल्हा न्यायालय हा मेट्रोचा विस्तारित मार्ग सुरु केला जाणार नसल्याचे कळविण्यात आले आहे. परिणामी, पुणेकरांना आणखी काही दिवस या मार्गाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, या मार्गाच्या उद्घाटनासाठी मेट्रोच्या इतर मार्गांच्या नियोजनात करण्यात आलेले बदलही रद्द करण्यात आले आहेत. मात्र, महामेट्रोच्या या निर्णयावरून नागरिक तसेच राजकीय पक्षांकडून महामेट्रोवर टीका केली जात असून मेट्रो प्रवाशांसाठी आहे की पंतप्रधानांच्या उद्घाटनासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच, नियोजनानुसारच आजच महामेट्रोने कोणत्याही एका प्रवाशाच्या हस्ते उद्घाटन करून सेवा सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.
https://www.instagram.com/p/DAXtLeKJ63n
काही प्रवाशांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत,
“आम्ही नियमितपणे या मार्गावरून पिंपरी-चिंचवड वरून प्रवास करतो. त्यामुळे ही विस्तारीत सेवा सुरू झाल्यास आमचा शिवाजीनगर ते स्वारगेट जाण्याचा आणखी वेळ वाचणार आहे. आज उद्घाटन होणार होते म्हणजे सेवा सुरू होणार होती. पावसाने कार्यक्रम रद्द झाला असला तरी प्रवाशांसाठी त्वरित आजच शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो सुरु करावी”, असे मेट्रोच्या प्रवाशांनी यांनी म्हंटले आहे.
https://www.instagram.com/p/DAXyHB-pGwI
“माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी प्रधानसेवक आहेत आणि भारतीयांची सेवा हाच त्यांच्या पंतप्रधान पदाचा मूळ हेतू आहे. हे त्यांनी २०१४ मध्ये भारताला सांगितलेले आहे. त्याचा प्रत्यय तर आज पुणेकरांना येईल अशी खात्री आहे. पुणे मेट्रो शिवाजीनगर ते स्वारगेट पुणेकरांच्या सेवेत नक्कीच दाखल होईल. पंतप्रधान येऊ शकत नसतील तर ते दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवतील, पुण्यातून एखाद्या ज्येष्ठ नागरिक प्रवासाच्या हस्ते उद्घाटन होईल. लोकांच्याच पैशातून तयार झालेल्या व्यवस्था सुरू करण्यासाठी लोकार्पणाची, मोठ्या मोठ्या सोहळ्यांची आणि उद्घाटनाची गरजच काय ?”, असा सवाल मेट्रोच्या प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
https://www.instagram.com/p/DAXwbm4CDuZ
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’