Supriya Sule | ‘मला दोघांचंही कौतुक वाटतं, तेच डर्टी डझन अतिशय विनम्रपणे भेटले’, अमित शहा अन् मुश्रीफांच्या भेटीवर सुप्रिया सुळे संतापल्या
मुंबई: Supriya Sule | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. कोल्हापूर दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी अजित पवार गटाचे नेते (Ajit Pawar NCP), मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची भेट घेतली. आता या भेटीवरून सुळे यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
https://www.instagram.com/p/DAX_Si_Jcu7
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ज्यांना एका वर्षापूर्वी हे डर्टी डझन म्हणत होते, तेच डर्टी डझन अतिशय विनम्रपणे अमित शहांना भेटले. मला कौतुक दोघांचंही वाटतं. अमित शहा यांचंही वाटतं, कारण त्यांचा पक्ष हसन मुश्रीफ यांना डर्टी डझनपैकी एक म्हणत होता.
https://www.instagram.com/p/DAX6p0bJLYo
मला गंमत त्या माणसाचीही वाटते, ज्याच्या बायकोला लढावं लागलं. त्यांच्या नातवडांना दूध मिळत नव्हतं. त्यांची बायको लढत होती. ज्यांनी ईडी तुमच्या घरी पाठवली. ते हसन मुश्रीफ अमित शहा यांना अभिवादन करत होते”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी हसन मुश्रीफांवर केली.
https://www.instagram.com/p/DAX3QlUpT7v
“दोघांची विश्वासार्हता इथे पणाला लागली आहे. अमित शहांना मला प्रश्न विचारायचा आहे की, ज्या माणसाच्या घरी तुम्ही ईडी पाठवली. ज्या माणसावर तुम्ही ईडी आणि सीबीआयच्या केसेस केल्या. त्या माणसाला डर्टी डझन तुमचा पक्ष म्हणत होता. मग तुम्ही त्याला हॅण्डशेक केलाच कसा?”, असा सवाल विचारत सुप्रिया सुळेंनी अमित शहांवर हल्लाबोल केला आहे.
https://www.instagram.com/p/DAXrMhDJ28P
त्या पुढे म्हणाल्या, “ती फाईल क्लिअर आहे का, मग भाजपाने आणि अमित शहांनी
टीव्हीवर येऊन सांगितले पाहिजे की, हो, मी जो हसन मुश्रीफांवर आरोप केला तो खोटा होता.
एवढं तरी अमित शहा यांनी खरं बोलावं. आणि हसन मुश्रीफांनीही त्यांना शेकहॅण्ड करताना आम्हाला सांगावं की हो, हे अमित शहा आहेत.
https://www.instagram.com/p/DAXn2EnJlCI
त्यांनी माझी माफी मागितली आहे. माझ्या घरावर हल्ला केला, माझ्या नातवंडांना दूध दिलं नाही. माझ्या बायकोच्या अश्रुंची किंमत अमित शहांनी आमच्या घरात येऊन फेडली म्हणून मी त्यांना हॅण्डशेक करतोय “, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी हसन मुश्रीफांवर निशाणा साधला.
https://www.instagram.com/p/DAXleTqJepX
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’