Maharashtra Politics News | ‘राजकीय परिस्थिती पाहता अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील’, बड्या नेत्याचा दावा

मुंबई: Maharashtra Politics News | लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसल्यानंतर आता आगामी विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीने जोरदार तयारी सुरु केलेली आहे. जागावाटपावरून महायुतीत (Mahayuti Seat Sharing Formula) रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे.
https://www.instagram.com/p/DAXrMhDJ28P
महायुतीत अजित पवारांना (Ajit Pawar NCP) शिंदे गट (Shivsena Shinde Group) आणि भाजप कडून (BJP) लक्ष्य केले जात आहे. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापूर्वीच बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटानेच चक्रव्यूह रचल्याची चर्चा असून अजित पवार या चक्रव्यूहात पुरते अडकल्याचे सांगितले जात आहे.
https://www.instagram.com/p/DAXyHB-pGwI
त्यामुळे महायुतीतून अजित पवार बाहेर पडतील अशी शक्यता वर्तवली जातेय. लोकसभेला अपेक्षित यश न मिळाल्याचे खापर अजित पवारांवर फोडले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही अजित पवार यांचा महायुतीत सहभाग असण्याला आक्षेप घेतला होता. दरम्यान अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील असे वक्तव्य विद्यमान आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केले आहे.
https://www.instagram.com/p/DAX6p0bJLYo
माध्यमांशी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी राजकीय भविष्यवाणी केली आहे. बच्चू कडू यांनी सध्याच राजकीय स्थिती आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये होणारे परिणाम याबाबत वक्तव्य केले. सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अशी अनेक चिन्ह दिसून येत आहेत. त्यामुळे अजित पवार हे महायुतीमधून बाहेर येतील असं वाटत आहे. किंबहूना ते आता आमच्यामध्ये येतील आणि महाशक्ती तयार होईल, असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे.
https://www.instagram.com/p/DAX_Si_Jcu7
बच्चू कडू म्हणाले, “अजित पवार जर महायुतीतून बाहेर गेले तरच त्यांची जागा त्यांना मिळेल.
अन्यथा त्यांना जागा मिळणार नाही. सगळ्या आघाडी आणि युतीमध्ये बरीच फाटाफूट होईल असं चित्र सध्या आहे. ते बाहेर पडतील आणि आमची महाशक्ती होईल. त्यांना आमच्या आघाडीत घ्यायचं की नाही हे आमची सुकाणू समिती ठरवेल. ते महायुतीमधून बाहेर पडतील असे काही संकेत आहेत. जशी तुमची सूत्र असतात तशी आमचेही सूत्र असतात”, असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केले आहे.
https://www.instagram.com/p/DAYB2g4C2Ef
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’