Kothrud Assembly Constituency | भाजप नेते अमोल बालवडकर यांच्या नावाची कोथरूड विधानसभेसाठी चर्चा; बालवडकर यांच्या गाठीभेटी-दौरे वाढले

BJP Leader Amol Balwadkar (1)

पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभेची घोषणा होऊ शकते. दरम्यान इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघात ‘जनसंवाद’ दौऱ्यादरम्यान भाजप नेते अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी बाणेर (Baner) येथील जानकी रेनबो आणि साई दत्त रेसिडेन्सी या सोसायटींमध्ये भेट देऊन नागरिकांशी विविध विषयांवर संवाद साधला.

यावेळी नागरिकांना भेडसावणारे विविध प्रश्न जाणून घेतले तसेच हे प्रश्न आगामी काळात लवकरात लवकर सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासित केले. कोथरूड भागात केलेल्या विकासकामांमुळे आणि भारतीय जनता पक्ष बळकट करण्यासाठी दिलेले योगदान पाहता भाजपाकडून अमोल बालवडकर यांनाच विधानसभेसाठी संधी मिळेल अशी चर्चा मतदारसंघात सुरु आहे.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)