Ajit Pawar NCP | अजित पवारांचं घड्याळ बंद पडणार? नवं चिन्ह मिळणार? दोन दिवसात फैसला होणार
पुणे : Ajit Pawar NCP | आगामी विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) निवडणुका तोंडावर आहेत. दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घड्याळ (Symbol Court Decision) ऐवजी दुसरं चिन्ह देण्यात यावं, अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने (Sharad Pawar NCP) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) केली होती. याबाबत आता १ आक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळं आता अजित पवार गटाचं टेन्शन वाढलं आहे.
https://www.instagram.com/p/DAfkBKHivvM
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नवं चिन्ह द्या. याचिकेचा निकाल लागत नाही तोपर्यंत घड्याळ चिन्ह वापरण्यास बंदी घाला. तसेच अजित पवारांना नव्या चिन्हाची मागणी करण्यास सांगा, अशी मागणी शरद पवारांच्या पक्षाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/DAfq_C9Cqh0
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाला अपक्षांचा मोठा फटका बसला होता. शरद पवार गटाला निवडणुकीत तुतारी हे चिन्हं मिळालं. तर काही अपक्षांना पिपाणी चिन्ह मिळालं होतं. या चिन्हामुळे मतदार संभ्रमीत झाला आणि शरद पवारांची मतं अपक्षांना मिळाली होती. विधानसभेत हा घोळ टाळण्यासाठी आणि अजित पवारांच्या अडचणी वाढवण्यासाठी शरद पवारांकडून हा नवा डाव टाकण्यात आल्याचे बोलले जातेय. (Ajit Pawar NCP)
https://www.instagram.com/p/DAfok_SCpFJ
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)