Kothrud Assembly Constituency | कोथरूड विधानसभेसाठी भाजप नेते अमोल बालवडकरांनी ठोकला शड्डू; राजकीय घडामोडींना वेग

Amol Balwadkar

पुणे: Kothrud Assembly Constituency | राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत (Maharashtra Assembly Election 2024). त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. इच्छुकांची देखील तयारी सुरु असून पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. दरम्यान, इच्छुक उमेदवार मतदारसंघात मतदारांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. (Kothrud Assembly Constituency)

कोथरुड विधानसभा मतदारसंघात भाजप नेते (BJP Leader) अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी ‘जनसंवाद’ दौऱ्यादरम्यान (Jan Samvad Tour) बालेवाडी येथील ‘द पर्ल सोसायटी’ मध्ये (The Pearl in Balewadi) भेट दिली. यावेळी सोसायटीतील नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. दरम्यान, उपस्थित सर्वांशी संवाद साधत सोसायटीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी बालवडकर यांनी जाणून घेतल्या. तसेच आगामी काळात या समस्या सोडविण्याबाबत आश्वासन दिले.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोथरूड मतदारसंघातून उमेदवार म्हणून अमोल बालवडकर यांच्या नावाला पसंती असल्याची भूमिका यावेळी नागरिकांनी बोलून दाखवली. “विधानसभेच्या निवडणुकीत जेव्हा मी उमेदवार म्हणून उभा राहीन, तेव्हा आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला मतरुपी स्वरूपात द्यावा अशी इच्छा व्यक्त करून आपल्या विश्वासाला पात्र ठरेल, अशी कामगिरी करून दाखवेल”, अशी ग्वाही अमोल बालवडकर यांनी दिली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)

You may have missed