Maval Crime News | प्लॉटमध्ये ब्लॉस्ट केल्याने दगड लागून एका कामगाराचा मृत्यु; दोन कामगार जखमी, मावळातील मंगरुळ गावातील घटना

Dead-Body

पिंपरी : Maval Crime News | प्लॉटमध्ये दगड पाडण्याकरीता काहीही कल्पना न देता ब्लास्ट केल्याने त्याील दगड शेजारील कंपनीत कामगारांना लागून त्यात एका कामगाराचा मृत्यु झाला. अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले. ही घटना मावळ तालुक्यातील मंगरुळ गावाती कॉमोस कंपनीत शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली.

https://www.instagram.com/p/DAgTgqhpfwZ

अजित कुमार भुचकून साह (वय २५) असे मृत्यु पावलेल्या कामगाराचे नाव आहे. तर राम प्रवेश राम प्रसाद व राहुल राम प्रसाद हे गंभीर जखमी झाले आहे.

https://www.instagram.com/p/DAgN0KsC9CN

याबाबत मुनुस्वाती वर्धराजनारायण स्वामी (वय ५२, रा. कातवी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Talegaon MIDC Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अरुण भेगडे यांच्या प्लॉटमध्ये ब्लास्टिंग करणार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे.

https://www.instagram.com/p/DAf_IUKp5mv

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कॉमोस कंपनीमध्ये कामाला आहेत. मंगरुळ गावात त्यांची कॉमोस कंपनी आहे. तिच्या बाजुला अरुण भेगडे यांचा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये दगड पाडण्याकरीता कोणतीही पूर्व सूचना न देता ब्लास्टिंग करण्यात आले. या ब्लास्टिंगमध्ये काही दगड उडून ते कंपनीत काम करणार्‍या कामगारांना लागून ते गंभीर जखमी झाले. त्यात अजित साह याचा मृत्यु झाला. पोलीस उपनिरीक्षक गोवारकर तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAf7shdCxzj

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)

You may have missed