Two Policemen Suspended In Pune | 14 हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही बेडशीट घेऊन जाणारे दोन पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित; वंचित बहुजन सामाजिक संघाच्या तक्रारीनंतर कारवाई
पुणे : Two Policemen Suspended In Pune | रस्त्यावर बेडशिट विक्री करणार्या विक्रेत्याकडून १४ हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही २३ बेडशिट घेणाया दोघा पोलीस शिपायांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav) यांनी निलंबित केले आहे.
https://www.instagram.com/p/DAm7qfbpj_K
पोलीस अंमलदार सुनिल भगवान कुसाळकर (Sunil Bhagwan Kusalkar) आणि संजय महादेव आसवले (Sanjay Mahadev Aswale) अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. दोघेही विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) नेमणूकीला होते. हा प्रकार १७ सप्टेबर रोजी विमाननगर येथे घडला होता. वंचित बहुजन सामािजक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे (Amol Nikalje) यांनी तक्रार दिल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई केली आहे.
https://www.instagram.com/p/DAnBOwHJcK2
याबाबतची माहिती अशी, अल्थमेश व त्याचे मित्र विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात सर्व जण बेडशिट विक्रीसाठी थांबले होते. १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पोलीस शिपाई सुनिल कुसाळकर व संजय आसवले तेथे आले. तुम्ही का थांबलात इथे थांबायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल, असे सांगून त्यांच्याकडील ६० बेडशिट स्कार्पिओ गाडीमध्ये टाकून निघून गेले. त्यानंतर विक्रेत्यांकडून त्यांनी १४ हजार रुपये हप्ता म्हणून घेतले. त्यानंतर अल्थमेश व त्यांचे मित्रांनी बेडशिटची मागणी केल्यानंतर त्यांनी ६० बेडशिटपैकी ३७ बेडशिट परत दिले. २३ बेडशिट स्वत:कडे ठेवून घेतले होते.
https://www.instagram.com/p/DAm9yjtJQBK
याबाबत वंचित बहुजन सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे
यांनी विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी (PI Ajay Sankeshwari)
यांना १८ सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दिला होता. पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार (PI Sarjerao Kumbhar)
यांनी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही पाहून सर्वांचे जाब जबाब नोंदवून घेतले.
तरीही विमानतळ पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.
त्यामुळे ३० सप्टेबर रोजी अमोल निकाळजे यांनी कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यानंतर आता पोलीस दलाच्या शिस्तीचे उल्लंघन करुन अशोभनीय असे बेशिस्त व
बेजबाबदारपणाचे वर्तन केल्याने दोघांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबित केले आहे.
https://www.instagram.com/p/DAlnk3SJFnd
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा