Supriya Sule On Rohit Pawar | ‘रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले…’ सुप्रिया सुळेंचे वक्तव्य चर्चेत; म्हणाल्या – ‘शरद पवारांचा वारसा त्यांनी चालवला तर…’

Sharad-Pawar-Supriya-Sule

पुणे: Supriya Sule On Rohit Pawar | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सर्व पक्षांकडून सुरु आहे. दरम्यान, निवडणुकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत चर्चा आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी कर्जत (Karjat Jamkhed Assembly Constituency ) मधील विविध विकासकामांचे उदघाटन केल्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचा उल्लेख करत रोहित पवारांचे नाव घेतले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांनी भुवया उंचावल्याचं पाहायला मिळालं.

https://www.instagram.com/p/DAk9qlzi2va

याबाबत माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, ” माझ्या वडिलांचा वारसा कुणीही चालवू शकते. रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले किंवा शरद पवारांचा वारसा त्यांनी चालवला तर माझी हरकत असण्याचे कारणच काय?, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/DAk64-TJPRi

अमित शहा (Amit Shah) पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून, मुंबई,
नवी मुंबईत बैठका घेणार आहेत. यावर बोलताना, अतिथी देवो भव. पाहुण्यांचे स्वागत झाले पाहिजे, आम्ही अदृश्य शक्ती वाले नाही. आम्ही संविधानवाले आहोत, संविधान केंद्र ठेवून आम्ही राजकारण करतो, सशक्त लोकशाहीमध्ये दिलदार विरोधक असला पाहिजे. शरद पवार यांना रोखा, उद्धवजींना रोखा आणि वेळ पडली तर पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा आणि सत्तेमध्ये या, अशी त्यांची विचारसरणी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.

https://www.instagram.com/p/DAkw-8RifZy

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)

You may have missed