Sanjay Kakade News | भाजपला मोठा धक्का! संजय काकडे हातात तुतारी घेणार; पुण्यात राजकीय घडामोडींना वेग

Sanjay Kakade

पुणे: Sanjay Kakade News | लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) मोठी इन्कमिंग सुरु आहे. शरद पवारांची विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टीने आखलेली रणनीती कामी येत आहे. पक्षात बंड झाल्यानंतर लोकसभेला आणि आता आगामी विधानसभेसाठी हेरून ठेवलेले नेते हाती तुतारी (Tutari) घेताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/DA5_Y4LiTCW

महायुतीच्या (Mahayuti) अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामध्ये समरजितसिंह घाटगे (Samarjeetsingh Ghatge), हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil), बापू पठारे (Bapu Pathare) यांचा समावेश आहे. तर अन्य नेते प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आता शहरातील बडे नेते संजय काकडे देखील लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. संजय काकडेंनी साथ सोडली तर विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला हा मोठा धक्का मानला जातोय.

https://www.instagram.com/p/DA6AmozJxo0

काकडे हे दसऱ्यानंतर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. संजय काकडे हे राज्यसभेचे माजी खासदार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेल्या काही दिवसापासून संजय काकडे हे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.

https://www.instagram.com/p/DA71QCJpZ4P

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed