Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा; अजित पवारांना आणखी एक धक्का

चिंचवड: Ajit Pawar NCP | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुतीतील (Mahayuti) अनेक नेते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणे पसंद करीत आहेत. आगामी काळात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेत शरद पवारांनी (Sharad Pawar NCP) इंदापुरमध्ये (Indapur Assembly) हर्षवर्धन पाटलांच्या (Harshvardhan Patil) पक्षप्रवेशावेळी दिले होते.
https://www.instagram.com/p/DA5Fq_eCh-Q
दरम्यान आता लोकसभेला शिरुरमधून (Shirur Assembly) उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेले भोसरीचे (Bhosari Assembly) माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) हे अजित पवारांची साथ सोडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. लांडे यांनी पुण्यातील मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतल्याने ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.
https://www.instagram.com/p/DA5JlDdJdG1
तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भोसरी दौऱ्यावेळी लांडेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. ही गैरहजेरी म्हणजे विलास लांडेच्या शरद पवार गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब करणारी आहे, अशी चर्चा शहरात रंगलेली आहे.
https://www.instagram.com/p/DA5NGFMpQRd
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण