Ramesh Bagwe News | राज्यातील महिला व दलितांवरील अत्याचार करणाऱ्या आरोपींना अटक करुन तात्काळ कारवाई करा अन्यथा राज्यभर आंदोलन करणार – रमेश बागवे (Video)
बोपदेव घाटतील आरोपी न सापडणे हा शासनाचा नाकार्तेपणा – रमेश बागवे
पुणे : Ramesh Bagwe News | गेल्या काही दिवसापासून राज्यभरात महिला ,अल्पवयीन मुले दलित अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ पुण्यात माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्त्वात आज भव्य जन आक्रोश मोर्चा (Jan Aakrosh Morcha) काढण्यात आला . राज्यात महिलावरील अत्याचार राजरोसपणे चालू आहेत ,दलित समाजावर गावगावात आत्याचार होत आहेत.राज्यात कायदाचा धाक अजिबात राहीला नाही .या आत्याचाराचा निषेध करण्यासाठी मातंग एकता आंदोलनाच्या वतीने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. (Matang Samaj)
https://www.instagram.com/reel/DA8S54xJFVQ/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
मोर्चाची सुरुवात क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या भवानी पेठेतील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली .यावेळी जेष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांना श्रधांजली अर्पण करुन मोर्चाची सुरुवात करण्यात आली .या मोर्चात सर्वात पुढे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे ,महात्मा फुले ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व महापुरुषांच्या वेषात तर लोकशाहिचे चार स्तंभाची हतबलता दाखवणारी प्रतिकृती तयार करण्यात आली होती.
https://www.instagram.com/p/DA8RujVJ0yp
हा मोर्चा क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे ,अरुणकुमार वैद्य स्टेडियम भवानी पेठ
पासून सुरुवात झाली पुढे नाना पेठ ,रास्ता पेठ ,सोमवार पेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला .या आंदोलनात मातंग एकता आंदोलनाचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश बागवे , सौ.झैनाब रमेश बागवे ,महिला अध्यक्षा ॲड. राजश्री अडसूळ, विठ्ठल थोरात , बापू दाखले, सुरेखा खंडागळे, संजय अल्हट, यादवराव सोनावणे, अनिल हतागळे यासह हजारोंच्या संख्येने महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
https://www.instagram.com/p/DA8EswHp786
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का
Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण