Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीच्या प्रचाराची कमान उदयनराजे भोसलेंच्या खांद्यावर? बैठकीत खलबतं; उदयनराजे राजकीय मुत्सद्दीपणा दाखवणार

Udayanraje-Bhosale

सातारा: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा सातारा जिल्ह्यात (Satara BJP) रोवण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विशेष रणनीती आखली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच मुंबईत पार पाडली. या बैठकीत सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांचा विशेष आढावा घेण्यात आला.

https://www.instagram.com/p/DA8EswHp786

कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव आणि सातारा व वाई या पाच विधानसभा मतदार संघात महायुतीसाठी उदयनराजे सक्रिय होणार आहेत. या पाच मतदारसंघांमध्ये भाजपचे बारकाईने लक्ष राहणारा असून बरीचशी सूत्रे ही जलमंदिर येथून हलण्याची शक्यता आहे. सर्व आमदारांबरोबर समन्वयाने काम करून उदयनराजे जास्तीत जास्त आमदार सातारा जिल्ह्यातून निवडून येतील यासाठी सक्रिय राहणार आहेत.

https://www.instagram.com/p/DA8DN7lpPyJ

या बैठकीमध्ये उदयनराजे भोसले यांनी या सर्व मतदारसंघाची अत्यंत बारकाईने मांडणी केली आणि सर्व कार्यकर्त्यांनी विशेषता बूथ प्रमुख, मंडल प्रमुख तसेच वेगवेगळ्या आघाड्यांचे प्रमुख यांनी एकत्रित काम केल्यास विजय निश्चित आहे अशी ठाम भूमिका उदयनराजे यांनी बैठकीत मांडली.

https://www.instagram.com/p/DA8Aeq6C9fF

फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय समन्वय उत्तम आहे महायुतीच्या प्रचाराची आणि रणधुमाळीची कमान ही खासदार उदयनराजे भोसले यांच्याच खांद्यावर राहतील अशा वरिष्ठ नेत्यांच्या हालचाली आहे. शिंदे गटासाठी सातारा जिल्ह्यामध्ये शंभूराज देसाई व आमदार महेश शिंदे हे उदयनराजे यांच्याबरोबर समन्वयाने सक्रिय राहणार आहेत.

https://www.instagram.com/p/DA79178psxU

तसेच राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) यांचा वाई मतदारसंघात एक हाती करिष्मा असला तरी महाविकास आघाडीने येथे जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळी उदयनराजेसाठी आमदार मकरंद पाटील यांनी अखेरच्या टप्प्यात आपला राजकीय मुत्सद्दीपणा दाखवला होता.

https://www.instagram.com/p/DA742QEJvWD

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed