Indapur Assembly Constituency | इंदापूरातील बंडखोरीने हर्षवर्धन पाटलांची वाट बिकट तर भरणेंची लाईन क्लिअर?; पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

Harshvardhan Patil - Sharad Pawar

इंदापूर: Indapur Assembly Constituency | माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी भाजपला (BJP) रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (Sharad Pawar NCP) पक्ष प्रवेश केल्याने इंदापूर मतदारसंघातील उमेदवारीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवीण माने (Pravin Mane), अप्पासाहेब जगदाळे (Appasaheb Jagdale), भरत शहा (Bharat Shah) हे नेते हर्षवर्धन पाटलांच्या येण्याने नाराज आहेत. त्यांनी बंडखोरीची भाषा करत मतदारसंघात तिसरा पर्याय देण्याची घोषणा केली आहे.

https://www.instagram.com/p/DA8XlQGJpCD

त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या वाटेत निष्ठावंतांकडूनच अडथळा निर्माण झाला आहे. यावरून हर्षवर्धन पाटील यांची वाट बिकट झाली असली तरी दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांची लाईन क्लिअर झाली आहे. या तीन नेत्यांच्या बंडखोरीने हर्षवर्धन पाटलांच्या विजयाच्या मनसुब्यावर पाणी फिरणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

https://www.instagram.com/p/DA8RujVJ0yp

कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा हे इंदापूर शहरासह उजनी बॅक कॉटर परिसरामध्ये शेतकऱ्यांसह व्यापारी उद्योजक यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेत असतात. त्यामुळे या भागावर त्यांचे प्राबल्य आहे. त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गात अनेक अडसर उभे राहिले आहेत.

https://www.instagram.com/p/DA8QelrptCP

पुणे जिल्हा बँक व इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी भक्कम नाळ असणारे अप्पासाहेब जगदाळे हे हर्षवर्धन पाटील यांचे नात्याने मामा आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीत अप्पासाहेब जगदाळे यांचे महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. त्यांनीच त्यांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.

https://www.instagram.com/p/DA8EswHp786

सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांचे शेतकऱ्यांशी सलोख्याचे संबंध असून दुग्ध व्यवसायामुळे गावोगावी त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात व दुग्ध व्यवसायामुळे इंदापूर तालुक्याच्या प्रगतीमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे.

https://www.instagram.com/p/DA8DN7lpPyJ

पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती म्हणून त्यांच्या कार्यकाळामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी इंदापूर तालुक्यासाठी खेचून आणण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये त्यांची क्रेझ देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने त्याचा देखील फटका हर्षवर्धन पाटील यांना बसणार आहे.

https://www.instagram.com/p/DA8CBweC3wO

हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाने निष्ठावंतांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला फायदा होईल की तोटा हे आता समजू शकत नाही मात्र इंदापूर तालुक्यात जी सहानुभूती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची होती ती या प्रवेशामुळे कमी झाली आहे.

https://www.instagram.com/p/DA7phM_C0_T

निष्ठावंत असलेले आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, भरत शहा यांनी पत्रकार परिषद घेत हर्षवर्धन पाटील यांच्या बद्दलची नाराजी व्यक्त केली व तालुक्याला तिसरा पर्याय हवा यासाठी ११ तारखेला मेळावा आयोजित केला आहे.

https://www.instagram.com/p/DA7mV1zJcoU

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed