Maharashtra Assembly Election 2024 | पुढील 3-4 दिवसात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता, मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी रणनीती आखत मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. नेते दौरे आणि सभांमध्ये व्यस्त आहेत. इच्छुक उमेदवारावर मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील तीन ते चार दिवसात आचारसंहिता लागू होईल, अशी शक्यता वर्तवली जातेय. (Code Of Conduct)
https://www.instagram.com/p/DA8kdHpJeYk
दरम्यान आज (दि.१०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत तब्बल ८० निर्णय महायुती सरकारने (Mahayuti Govt) घेतले. मागील काही दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत बरेच निर्णय घेण्यात आले. त्यात आज झालेली बैठक शेवटची असावी, कारण पुढील ३ – ४ दिवसात राज्यात आचारसंहिता लागू होईल, असा अंदाज मंत्री गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) वर्तवला आहे.
https://www.instagram.com/p/DA8b8EAJdca
गिरीश महाजन म्हणाले, मंत्रिमंडळाची ही कदाचित शेवटची बैठक असणार आहे, त्यासाठी आम्ही जास्त निर्णय घेतले. तुम्ही मागील ५० – ६० वर्षाचा इतिहास पाहिला तर नेहमी हे होते. अखेरच्या २ – ३ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका असतात त्यात मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले जातात. त्यामुळे ही काही नवीन बाब नाही, असं मंत्री महाजन यांनी सांगितले.
https://www.instagram.com/p/DA8XlQGJpCD
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का
Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण