Gang Rape In Bopdev Ghat Pune | बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट ! अत्याचार करणारा एक संशयित पुणे पोलिसांच्या ताब्यात, इतर दोघांचा शोध सुरु

Gang-Rape-In-Bopdev-Ghat-Pune

पुणे : Gang Rape In Bopdev Ghat Pune | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज होत असलेल्या नवीन ७ पोलीस ठाण्यांचे उद्घाटन व अन्य नवीन प्रकल्पांच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक सामुहिक बलात्काराच्या घटनेमध्ये पुणे पोलिसांना मोठा लीड मिळाला आहे. पोलिसांनी एका आरोपीला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. याबाबत सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, एकदा सर्व बाबी स्पष्ट झाल्या की आपल्याला माहिती दिली जाईल. इतर दोघांचा शोध सुरु आहे.

https://www.instagram.com/p/DA-duNOJ1ua

या आरोपींबाबत पिडित तरुणीने आरोपींची खातरजमा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने या नराधमांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले आहे. येवलेवाडीच्या एका वाईन शॉपमधून दारु खरेदी करत असताना ते सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते, असे सांगण्यात येत आहे.
https://www.instagram.com/p/DA-TMdSpIXJ/

पुणे पोलिसांनी या प्रकरणात अद्याप गोपनीयता बाळगली असून अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही.
बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुण तरुणीपैकी तरुणाला मारहाण करुन बांधून ठेवले गेले. त्यानंतर तरुणीवर तिघांनी सामुहिक बलात्कार केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेले काही दिवस पुणे पोलीस दिवसरात्र तपास करीत होते. त्यासाठी पोलिसांची ६० पथके काम करीत होती. आरोपींची माहिती देणार्‍यांना १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अखेर आरोपीपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले आहे.

https://www.instagram.com/p/DA-NipwJAV9

दरम्यान, नवीन ७ पोलीस ठाण्यांचे उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका आरोपीला ताब्यात घेतल्याचे जाहीर केले आहे.

https://www.instagram.com/p/DA-P_CJpvZQ

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed