Maharashtra Assembly Election 2024 | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मविआ नेत्यांची बैठक; प्रशांत जगताप म्हणाले – ‘जे निष्ठावंत आहेत अन् जे उमेदवार जिंकतील अशांनाच उमेदवारी’

Prashant Jagtap

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान आज आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन (Congress Bhavan Pune) येथे महाविकास आघाडीतील नेत्यांची जवळपास तासभर बैठक झाली.

या बैठकीला काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde), राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap), आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी (Mohan Joshi Congress) यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशांत जगताप माध्यमांशी बोलताना म्हणाले, ” आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरातील प्रमुख नेते मंडळींची बैठक झाली आहे. निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असून येत्या काळात महाविकास आघाडीतील प्रमुख नेते मंडळींच्या सभा, मेळावे आणि रॅली होणार आहेत. त्या दृष्टीने चांगल्या प्रकारे चर्चा झाली आहे.

तसेच येत्या दोन दिवसात उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
पण आम्ही सर्वजण येणार्‍या निवडणुकीसाठी तयार आहोत, जे निष्ठावंत आहेत आणि नागरिकांमध्ये चांगला जनसंपर्क आहे.
अनेक विकास कामे केली आहेत. त्या इच्छुकांचा निश्चित विचार होईल, त्यामुळे शहरात दुसरे काही चुकीचे होईल,
असे वाटत नाही आणि जे उमेदवार जिंकतील अशांना निश्चित उमेदवारी दिली जाईल”,असे जगताप यांनी म्हंटले आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला

Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

You may have missed