Pune PMC Elections | राघवेंद्र मानकर यांचा राज्यात सर्वाधिक मतांनी विजय ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात खंडु लोंढेचा निसटता विजय

Pune PMC Elections | Raghavendra Mankar wins with the highest number of votes in the state! Khandu Londhe wins in the stronghold of NCP

पुणे : Pune PMC Elections | पुण्यातील मध्य वस्तीतील पेठा परिसर हा भाजपचा बालेकिल्ला, त्यात  स्वत:च्या कामाने करिश्मा निर्माण करणारे भाजपचे राघवेंद्र(बापू) मानकर यांनी राज्यात सर्वाधिक मतांनी विजय मिळविला. त्याचवेळी प्रभाग क्रमांक १७ रामटेकडी -माळवाडी -वैदुवाडी या उपनगरातील प्रभागात खंडु लोंढे यांनी निसटता विजय मिळविला आहे.

प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई या प्रभागात राघवेंद्र मानकर यांना ३१ हजार ९८१ मते मिळाली. समीर गायकवाड (शिवसेना ठाकरे) यांना ५ हजार ४८४ मते मिळाली. राघवेंद्र मानकर यांनी तब्बल २६ हजार ४९७ मतांनी विजय मिळविला. हा राज्यात सर्वाधिक मतांचा विजय ठरला आहे.
त्यानंतर भाजपचे प्रभाग क्रमांक ३२ ब वारजे -पॉप्युलरनगरमधील उमेदवार भारतभूषण बराटे यांनी तब्बल २५ हजार २७ मतांनी विजय मिळविला आहे. बराटे यांना ३४ हजार १९८ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण बारटक्के यांना ९ हजार १७१ मते मिळाली.

प्रभाग क्रमांक ४ खराडी वाघोलीमध्ये भाजपच्या रत्नमाला सातव यांनी पुण्यातील तिसर्‍या क्रमांकाच्या मताधिक्याने विजय मिळविला. रत्नमाला सातव यांना ४१ हजार ५१४ अशी सर्वाधिक मते मिळाली. राष्ट्रवादी काँगे्रसच्या वसुंधरा उबाळे यांना १८ हजार ३७८ मते मिळाली. सातव यांचा २३ हजार १३६ मतांनी विजय मिळाला आहे.

भाजपच्या स्वरदा बापट  यांनी २२ हजार ६८१ मते, नारायण लोखंडे यांनी २१ हजार ८९ मते आणि तृप्ती भरणे  यांनी २० हजार १३४ मताधिक्यांनी विजय मिळविला आहे.

पुण्यातील सर्वात अटीतटीची लढत प्रभाग क्रमांक १७ रामटेकडी – माळवाडी – वैदुवाडी या प्रभागात झाली. भाजपचे खंडु लोंढे यांना १४ हजार २२३ मते मिळाली तर त्यांचे विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक कांबळे यांना १४ हजार १६८ मते मिळाली. खंडु लोंढे यांना फक्त ५५ मतांनी निसटता विजय मिळाला.

काँग्रेसचे अविनाश रमेश बागवे हे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल गेल्या काही वर्षांपासून महापालिकेवर निवडून जात होते. यंदाही त्यांना आपला विजय अपेक्षित होता. परंतु, त्यांचा केवळ ६२ मतांनी पराभव झाला.

प्रभाग क्रमांक २२ कासेवाडी -डायस प्लॉट येथून भाजपचे विवेक यादव हे विजयी झाले. त्यांना १२ हजार ४२३ मते मिळाली तर, काँग्रेसचे अविनाश बागवे यांना १२ हजार ३६९ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहानूर शेख यांना ८ हजार २ मते मिळाली. मतविभाजनामुळे त्यांना बागवे यांना पराभव स्वीकारावा लागला.

बंडु आंदेकर टोळीतील कारागृहातून निवडणुक लढवत असलेल्या आंदेकरांपैकी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांच्या प्रभाग क्रमांक २३ मधील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. लक्ष्मी आंदेकर यांनी १४१ मतांनी निसटता विजय मिळविला. लक्ष्मी आंदेकर यांना १२ हजार ६४१ मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या ऋतुजा गडाळे यांना १२ हजार ५०० मते मिळाली.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंजली ओरसे (२१६), सूरज लोखंडे (२२८),भाजपच्या मृणाल कांबळे (२३२),  स्वप्नील दुधाणे (३८५) यांनी निसटत्या मतांनी विजय मिळविला आहे.

You may have missed