Chinchwad Assembly Constituency | मोरेश्वर भोंडवेंच्या शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष प्रवेशाने जागावाटपाचा तिढा वाढला; चिंचवडमध्ये शिवसेना ठाकरे गट तर पिंपरी अन् भोसरीमध्ये ?
पिंपरी: Chinchwad Assembly Constituency | अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे (Moreshwar Bhondve) यांनी नुकतेच हाती शिवबंधन (Shivbandhan) बांधल्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) चिंचवडची जागा शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena Thackeray Group) सुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पिंपरी (Pimpri Assembly) आणि भोसरीमधील (Bhosari Assembly) शिवसेनेतील इच्छुकांनी चिंचवडची पडणारी जागा नको, आयात उमेदवाराचे काम करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. भोंडवे यांच्या प्रवेशामुळे कोंडी झालेले शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत.
महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) एकाही पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नव्हता. त्यामुळे भोंडवे यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्याचे सांगितले जाते. चिंचवड मतदारसंघात भाजपची मोठी ताकद असून बालेकिल्ला मानला जातो. तीनवेळा भाजपच्या चिन्हावर लढलेला उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे चिंचवडची पडेल जागा पक्षाला नको अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
चिंचवड पेक्षा पिंपरी, भोसरीत पक्षाचे संघटन आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांवरील दावा सोडण्यास पदाधिकाऱ्यांनी नकार दिला. भोंडवे यांच्या प्रवेशामुळे कोंडी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आयात उमेदवाराचे काम करणार नसल्याचा ठरावही केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले (Sachin Bhaosale Shivsena) माध्यमांशी बोलताना म्हणाले,
” कोणालाही विश्वासात न घेता भोंडवे यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. संघटना वाढीसाठी पक्षात येणाऱ्यांचे स्वागत करतो.
परंतु, उमेदवारीसाठी प्रवेश करत असेल तर आम्ही त्या व्यक्तीचे काम करणार नाही.
निवडून येण्याची शक्यता कमी असलेली चिंचवडची जागा आम्ही मागितली नाही. चिंचवडची जागा नको आहे,
पक्षश्रेष्ठींनी याचा विचार करावा”, असे भोसले यांनी म्हंटले आहे. (Chinchwad Assembly Constituency)
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
