Maharashtra Assembly Election 2024 | बंडखोर नॉट रिचेबल; महायुती-मविआचे टेन्शन वाढलं; विनंती, आमिष अन् आता कारवाईचा इशारा

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) प्रचाराला सुरुवात झालेली आहे. मात्र अनेक मतदारसंघात झालेल्या बंडखोरीमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तर २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. त्यामुळे बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही बाजुंनी प्रयत्न केले जात आहेत.
प्रलोभने, भविष्यातील आश्वासने देऊनही दाद न देणाऱ्या बंडखोरांवर आता कारवाई करण्याची तयारी सुरू झाली असून, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसा इशाराच दिला आहे. काही बंडखोर तर उमेदवारी अर्ज भरून अज्ञातवासात गेल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी बुधवारी रात्री शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची बैठक झाली. या बैठकीत एकमेकांसमोर उभ्या असलेल्या अधिकृत उमेदवारांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. ‘बहुतांश लोक अर्ज मागे घेण्याच्या मनस्थितीत आहेत. उमेदवारी न मिळाल्याने थोडी नाराजी असू शकते. पण कोणीही पक्षशिस्त मोडणार नाही’, असे भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
तर महाविकास आघाडीतील (Mahvikas Aghadi) बंडखोरीबाबत शरद पवार (Sharad Pawar)
म्हणाले, ” महाविकास आघाडीत बंडखोरीचा मोठा प्रश्न नाही.
१०-१२ जागांवर दोन पक्षांनी उमेदवार भरल्यामुळे प्रश्न निर्माण झाला असला तरी एक दोन
दिवसात बैठका घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल”,असे पवार यांनी सांगितले.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) म्हणाले,
” विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे बंडखोरांना समजवण्याचे काम करत आहेत.
त्यांनी माघार घेण्यासाठी आम्ही संपर्क करत आहोत. त्यांना विनंतीही करतो आहोत.
मात्र विनंती करुनही जे माघार घेणार नाहीत त्यांना पक्षातून बाहेर काढण्याचे कामसुद्धा लगेच होईल”,
अशी प्रतिक्रिया रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा