Katraj Kondhwa Road | कात्रज कोंढवा रस्त्यासाठी सक्तीने भूसंपादनाची प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूण करणार – जिल्हा प्रशासन

Katraj-Kondhwa Road | Approval for land acquisition of Katraj-Kondhwa Road; 50 meter widening accelerated, Rs 276 crores cleared

पुणे : Katraj Kondhwa Road | कात्रज कोंढवा रस्तारुंदीकरणासाठी सक्तीने भूसंपादन करण्यात येणार आहे. येत्या ३१ मार्च अखेरीपर्यंत  भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असा शब्द जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आला आहे, अशी माहिती या बैठकीला उपस्थित वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.  

केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांनी आज जिल्हा प्रशासनाची बैठक घेत जिल्ह्यातील व शहरातील रस्ते, उड्डाणपुलाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम तसेच कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची सद्यस्थिती आणि अडचणींवर चर्चा झाली. नितीन गडकरी यांनी यावेळी कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम राजस सोसायटीतील चौकात रॅम्पसाठी जागा उपलब्ध नसल्याने रखडल्याचे व भूसंपादनाची जबाबदारी महापालिकेची असल्याचे स्पष्ट केले.

या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिली. राजस सोसायटी ते कोंढवा खडीमशीन दरम्यान ५० मी. रुंद रस्ता करण्यात येणार आहे. राजस सोसायटी तसेच मधल्या टप्प्यात जागा मालकांसोबत भूसंपादनाबाबत योग्य तडजोड न झाल्याने प्रशासनाने सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या भूसंपादनाच्या निवाड्यापोटी १३६ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्गही करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादना संदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे देण्यात आले आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल अशी माहिती यावेळी देण्यात आली.

You may have missed