Parvati Assembly Election 2024 | ‘मतदारसंघातील जनता विजयाची तुतारी वाजवणारच’, अश्विनी कदम यांचा विश्वास, पदयात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग

Ashwini Kadam

पुणे: Parvati Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवारांनी प्रचाराची जोरदार सुरुवात केलेली आहे. दरम्यान उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. “सातत्याने गेली १५ वर्षे सत्तेत असतानाही पर्वती विधानसभा मतदारसंघ विकासापासून उपेक्षित असल्याची टीका करत विकासाचा हा अनुशेष भरून काढण्यासाठी या मतदारसंघातील जनता विजयाची तुतारी वाजवणारच”, असा विश्वास महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम (Ashwini Nitin Kadam) यांनी व्यक्त केला आहे. (Parvati Assembly Election 2024)

अश्विनी नितीन कदम यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.मतदारसंघातील नागरिकांशी (दि.७) पहाटे संवाद साधत दिवसभर पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी प्रचार केला. पदयात्रेदरम्यान परिसरातील महिला, युवती, तरुण, ज्येष्ठ सर्वांनी त्यांची भेट घेत औक्षण करून शुभेच्छा दिल्या. यावेळी निलायम पुलापासून सुरू झालेली पदयात्रा- दांडेकर पूल- पानमळा वसाहत पूर्ण गणेश मळा येथे पार पडली.

अश्विनी कदम म्हणाल्या, ” लोकप्रतिनिधी म्हणून माझा प्रभाग पुण्यात आदर्श होईल,
यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला. पर्वती मतदारसंघातील जनतेसाठी मी कायमस्वरूपी उपलब्ध आहे.
पर्वती मतदारसंघाला गतिमान विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे”, असे कदम यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Shivaji Nagar Assembly | सुरक्षा आणि वाहतूक कोंडी सोडविण्यात शिवाजीनगरमधील आमदार, नगरसेवकांना आले अपयश

Chhagan Bhujbal On ED And BJP | ‘ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही भाजपबरोबर’, भुळजबळांच्या दाव्याने
राजकारणात खळबळ; म्हणाले – “मी OBC असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे, उच्च जातीचा असतो तर…’

Pune ACB Demand Trap News | जॅमर काढण्यासाठी लाचेची मागणी करणार्‍या सहायक फौजदारासह ट्राफिक वॉर्डनवर गुन्हा दाखल

You may have missed