Raosaheb Danve News | राज्यात मुख्यमंत्री पदावरून गदारोळ, रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ; चर्चांना उधाण

दिल्ली: Raosaheb Danve News | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळाले. त्यानंतर आता महायुतीतून मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणे बदलू शकतात. भाजपने जर नवा चेहरा पुढे आणला, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) किंवा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापैकी एकाला पुन्हा संधी दिल्यास भाजप-शिवसेना युतीचे सध्याचे स्थैर्य टिकून राहील, अशी देखील चर्चा आहे. (Who Will Next CM Of Maharashtra)
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे यासाठी त्यांच्या समर्थकांकडून दबाव वाढला आहे. तर दुसरीकडे मागील वेळी अधिक जागा असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी त्याग केला. आता त्यांच्या रणनीतीमुळेच एवढे मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडावी, अशी भूमिका भाजप नेत्यांची आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना केलेले रावसाहेब दानवे आता राज्यातील आपले राजकीय स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात आहेत. विधानसभा निवडणूक संचालन समितीचे प्रमुख असलेल्या दानवेंनी दिल्लीमध्ये भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे.
कालपासून दिल्लीमध्ये असलेल्या दानवेंनी केंद्रीय नेतृत्वाशी एकामागोमाग एक भेटीगाठी केल्या आहेत. यामुळे राज्यातील मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात दानवेंची ही धावपळ कोणासाठी आहे, यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या
Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’
Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन
Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार